जाहिरात

राष्ट्रवादीच्या मंत्र्या विरोधात भाजपने दंड थोपटले, नेत्याने थेट मुंबई गाठले

विद्यमान आमदारांना त्यांचा मतदार संघ मिळणार आहे. त्यामुळे महायुतीत नाराजी दिसत आहे. अगदी मंत्री असलेल्या मतदार संघातही आता मित्रपक्ष विरोध करत असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्या विरोधात भाजपने दंड थोपटले, नेत्याने थेट मुंबई गाठले
लातूर:

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत प्रत्येक मतदार संघासाठी रस्सीखेच सुरू आहे. ज्याचा आमदार त्याचा तो मतदार संघ असे सुत्र महायुतीत ठरले आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांना त्यांचा मतदार संघ मिळणार आहे. त्यामुळे महायुतीत नाराजी दिसत आहे. अगदी मंत्री असलेल्या मतदार संघातही आता मित्रपक्ष विरोध करत असल्याचे दिसून येत आहे. त्या पैकीच एक मतदार संघ आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय बनसोडे हे आहेत. शिवाय ते सध्याच्या महायुतीत सरकारमध्ये मंत्री ही आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महायुतीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अनेक जागांवर अजूनही पेच निर्माण झालेला आहे. त्यातून वाद आणि बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभेची जागा भाजपला मिळावी अशी मागणी होत आहे. या मतदार संघातून भाजप उमेदवार विजयी होवू शकतो असा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे ही जागा भाजपलाच मिळाली यासाठी कार्यकर्ते आग्रही आहे. त्या पार्श्वभूमीवर ⁠विश्वजित गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मुंबईत येत आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - गरबा खेळत असताना भोवळ आली, खाली कोसळला, पुण्यामध्ये भयंकर घडलं

मुंबईत ते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत. जवळपास 350 ते 400 पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे वरिष्ठांना भेटणार आहेत. बावनकुळे यांच्या बरोबर देवेंद्र फडणवीस यांची ही ते भेट घेतील.ही जागा भाजपने स्वत:कडे घ्यावी अशी ते मागणी करणार आहेत. या मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय बनसोडे हे विद्यमान आमदार आहेत. शिवाय ते राज्यमंत्रिमंडळात मंत्री ही आहेत. 

ट्रेंडिंग बातमी -  Election Results 2024 LIVE: आज हरियाणा, जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल, भाजप की काँग्रेस कोणाचा विजय?

उदगीर विधानसभा मतदार संघात नेहमीच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत राहीली आहे. संजय बनसोडे हे पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी भाजपच्या अनिल कांबळे यांचा पराभव केला होता. त्या आधी सलग दोन वेळा भाजपचे सुधाकर भालेराव हे या मतदार संघातून विजयी झाले होते. त्यामुळे भाजपला मानणारा मोठा मतदार या मतदार संघात आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते उदगीरसाठी आग्रही आहेत.  

Previous Article
ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे बाबत सरकारची उदासीनता, दोन महिने उलटले तरी ही...
राष्ट्रवादीच्या मंत्र्या विरोधात भाजपने दंड थोपटले, नेत्याने थेट मुंबई गाठले
MLA Rajkumar-Patel-Joins-Ekanath-Shinde-Sena-Ravi-Rana-Reveals-Secret
Next Article
प्रहारचे राजकुमार पटेल शिंदेंच्या सेनेत कसे गेले? मोठा गौप्यस्फोट