
विधानसभा निवडणुकीची तयारी सध्या महायुतीकडून जोरदार सुरू आहे. जागा वाटपाची चर्चाही सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जागा वाटपात जातीनं लक्ष घातल आहेत. काही जागांवरून महायुतीत रस्सीखेचही सुरू आहे. त्यात आता भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. पाटील यांनी भाजप सर्व जागांची तयारी करत आहे असे वक्तव्य केले आहे. शिवाय जर सर्व जागांची जर कोणता पक्ष तयारी करत नसेल तर तो मुर्ख पणा आहे असं ही ते बोलले आहे. शिवाय भाजप हा आपल्या अटी आणि शर्तींवर युती करतो हे ही त्यांनी आवर्जून सांगितलं आहे. आता त्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चंद्रकांत पाटील हे आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणतात राजकारणात कधी काही भांडण होईल आणि वेगळं लढावं लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळेच सर्व जागांवरची तयारी करावी लागते. आम्ही ही सर्व 288 जागावर तयारी करत आहोत असं ते म्हणाले. शिवाय 2014 सालीही आम्ही सर्व जागांवर तयारी केली होती. तसं केलं नसतं तर आम्हाला जवळपास 88 जागांवर उमेदवारचं भेटले नसते असेही त्यांनी सांगितले. शिवाय निवडणुकीच्या तोंडावर जर कोणता पक्ष सर्व जागांची तयारी करत नसेल तर तो मुर्ख पण समजला पाहीजे असंही त्यांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातमी - Akshay Shinde Encounter : 'अक्षय शिंदेचा एन्काउंटर नाही', उच्च न्यायालय म्हणाले...
पुढे ते असंही म्हणतात की, आम्ही या सर्व जागांची तयारी करत असतो म्हणजे आम्हाला युती नको असते असं नाही असंही सांगायला ते विसरले नाहीत.सदा सर्वकाळ आम्ही शतप्रतिशत भाजप याचाच विचार करतो. पण युती नको अशी आमची भूमिका नाही. भाजप युती ही आपल्या अटीशर्तींवर करते. ज्यावेळी रास्त चर्चा होत नाही. तसं बोलणं होत नाही अशा वेळी युती तुटते असं ही चंद्रकांत पाटील म्हणाले.
ट्रेडिंग बातमी - अक्षय शिंदेचं घर महिन्याभराने उघडलं, मृतदेह आणणार, घरी कोण-कोण आले?
दरम्यान महायुतीतल्या छोट्या पक्षांनी जागा मागणे काही चुकीचे नाही. तो त्यांचा अधिकार आहे. पण जे रास्त असेल त्या जागा त्यांनाही दिल्या जातील असंही ते म्हणाले. दरम्यान सध्या महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. त्याच वेळी पाटील यांनी दिलेली ही प्रतिक्रीया बोलकी आहे. त्यामुळे भाजप महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत कोणत्याही स्थितीत तडजोड करणार नाही असाच काहीसा संदेश पाटील यांना द्यायचा तर नव्हता ना अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world