जाहिरात

कोथरूड मार्गे कात्रजचा घाट? चंद्रकांत पाटलांचा पत्ता कट होणार?

चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर सोडून पुण्यात आले. त्यामुळे बाहेरचा उमेदवार अशी त्यांच्यावर टिका झाली. त्यामुळे यावेळी पक्ष नक्कीच संधी देईल अशी अपेक्षा अमोल यांनी केली आहे.

कोथरूड मार्गे कात्रजचा घाट? चंद्रकांत पाटलांचा पत्ता कट होणार?
पुणे:

पुण्यातील कोथरूड विधानसभेवरून भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झालीय. शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आता  कोथरूडसाठी शड्डू ठोकलाय. या मतदार संघात सध्या चंद्रकांत पाटील हे प्रतिनिधीत्व करतात. ते मंत्रीही आहेत. त्यांनाच थेट आव्हान बालवडकर यांनी दिले आहे. त्यामुळे उमदेवारीसाठी भाजपमध्ये आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे. या मतदार संघात मेधा कुलकर्णी या आमदार होत्या. त्यांची उमेदवारी कट करून कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटलांनाही मतदार संघ देण्यात आला होता. आता इथल्या स्थानिक नगरसेवकांनेच या मतदार संघावर दावा केला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढू शकतात. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

रक्षाबंधन च्या पार्श्वभूमीवर बालेवाडीत महायुतीने शक्तिप्रदर्शन केले. पण हे शक्तीप्रदर्शन कोथरूड विधानसभेसाठी  इच्छुक असलेल्या उमेदवारने केल्याचा दावा होता आहे. कोथरूडमध्ये सध्या उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे विद्यमान आमदार आहेत. तरी सुद्धा माजी नगरसेवक अमोर बालवडकर यांनी या मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शिवाय इच्छुक असणं  यात काही गैर नसल्याचं ही ते म्हणाले आहेत. असं असलं तरी त्यांनी पक्षातल्या बड्या नेत्यालाचा आव्हान दिले आहे.  

ट्रेंडिंग बातमी - जरांगे निवडणूक लढवण्याच्या तयारीत, आतापर्यंत 150 अर्ज; माजी आमदार-आमदारपुत्राचाही समावेश 

अमोल हे स्थानिक आहेत. चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर सोडून पुण्यात आले. त्यामुळे बाहेरचा उमेदवार अशी त्यांच्यावर टिका झाली. त्यामुळे यावेळी  पक्ष नक्कीच संधी देईल अशी अपेक्षा अमोल यांनी केली आहे. इलेक्टिव्ह मॅरिटच्या आधारावर पक्ष विचार करेल असं ते म्हणाले. परंतु, माझा विचार न केल्यास योग्य तो निर्णय घेईल, अस म्हणत त्यांनी बंडखोरीचा सूचक इशारा ही दिला आहे.  अमोल बालवडकर यांची मतदार संघात चांगली ताकद आहे. यानिमित्ताने कोथरूड विधानसभा मतदार संघात आता भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू झाल्याचं  चित्र बघायला मिळत आहे.

नक्की वाचा - न्यायालयातच वकील कोसळला, न्यायाधीशही धावले; नागपुरात वकिलाचा धक्कादायक शेवट!

कोथरूड मतदार संघात चंद्रकांत पाटील हे आमदार आहेत. शिवाय ते मंत्रीही आहेत. ते प्रदेशाध्यक्ष असताना त्यांना कोथरूडमधून उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी विद्यमान आमदा मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करत चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील हे विजयी झाली होते. यावेळी पाटील यांना पक्षातून विरोध होत आहे. शिवाय बंडखोरीची भाषाही बोलली जात आहे. त्यामुळे पाटील यांचे टेन्शन नक्कीच वाढले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
दोन वर्षापूर्वी गोळीबार... आता गुन्हा... ठाकरेंच्या नेत्याचा मुलगा अडकला
कोथरूड मार्गे कात्रजचा घाट? चंद्रकांत पाटलांचा पत्ता कट होणार?
Mahavikas Aghadi will hold a protest against Badlapur case in the state
Next Article
बंद मागे निषेध सुरू, ठाकरे, पवार, पटोले रस्त्यावर उतरणार