हरियाणा विधानसभे बरोबरच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होईल अशी पेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. हरियाणा बरोबर जम्मू कश्मीरची निवडणूक जाहीर झाली. मात्र महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाली नाही. आता ही निवडणूक कधी होणार याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी विधानसभा निवडणूक कधी होवू शकते याबाबत वक्तव्य केलं आहे. शिवाय महायुतीच्या जागा वाटपाबाबतही त्यांनी माहिती दिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच केली जाईल. ही निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या दुसऱ्या आठवड्यात होवू शकते असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ही निवडणूक दोन टप्प्यात पार पडेल. विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यामुळे दोन टप्प्यात त्या होण्याची शक्यताही शिंदे यांनी व्यक्त केली. वर्षा या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. निवडणूकीसाठी महायुती तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - भावी मुख्यमंत्री! महायुतीत आता 'या' दोन नेत्यांचे झळकले बॅनर
महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. हे जागा वाटप पुढील 8 ते 10 दिवसात पूर्ण होईल असे ही त्यांनी सांगितले. महायुतीत प्रत्येक पक्षाला योग्य वाटा मिळेल असेही ते म्हणाले. दरम्यान सरकारने राबवलेल्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांना सांगितले. सरकार योजना राबवताना विकास कामावरही लक्ष देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. योजना आणि विकास यांचा योग्य समतोल सरकारने राखला असल्याचेही त्यांनी सांगितले.
नक्की वाचा - 10 वर्षांनी पाळणा हलला, बारसं करून पुण्याला जाताना कुटुंब संपलं; ड्रिंक अँड ड्राइव्हमुळे 4 हकनाक बळी!
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही सध्या लोकप्रिय योजना ठरली आहे. जवळपास दिड कोटी महिलांनी लाडकी बहिण योजनेसाठी नोंद केली आहे. त्यांना त्याचा लाभही दिला जात आहे. शिवाय युवकांना रोजगाराच्या नव्या संधी सरकार उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे राज्यातलं जनमत सरकारच्या बाजूने आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचे सरकार राज्यात येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ट्रेंडिंग बातमी - 'मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न नाही' ठाकरेंनी माघार का घेतली? थेट कारण सांगितलं
झोपडपट्टी मुक्त शहर ही सरकारची संकल्पना आहे. त्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे म्हाडा असेल किंवा सिडको असेल त्या माध्यमातून घरे निर्माण केली जात आहेत. ही घर सर्व सामान्यांना दिली जातील असेही शिंदे यांनी वेळी सांगितले. सरकार विकासाला प्राधान्य देत आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून राज्याचा विकास करत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीलाच जनतेचा कौल मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world