जाहिरात

Congress News: काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरूच, आता 'या' नेत्यानं पक्षाचा हात सोडला

त्यांच्या राजीनाम्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Congress News: काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरूच, आता 'या' नेत्यानं पक्षाचा हात सोडला
जळगाव:

राज्यात काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाही. एकामागून एक नेते काँग्रेसला सोडत आहे. अनेक माजी आमदारांनी पक्षाची साथ सोडल्यानंतर आता महिला नेत्याही काँग्रेसचा हात सोडत आहेत.  काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा  प्रतिभा शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचा चेहरा म्हणून प्रतिभा शिंदे यांच्याकडे पाहीले जात होते. त्यांच्या राजीनाम्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

नक्की वाचा - Accident news: देव दर्शनाला जाणाऱ्या महिलांवर काळाचा घाला, 7 जणींचा मृत्यू तर 20 जखमी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना प्रतिभा शिंदे यांनी आपला राजीनामा पाठविला आहे. काँग्रेस पक्षातील गटबाजीमुळे आपल्याला काम करताना विविध अडचणीचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय पक्षातील या गटबाजीला कंटाळून आपण हे पाऊल उटलल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुढील काळात त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता देखील राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. 

 Love Story : भयंकर! विवाहित महिलेनं प्रियकराला घरी बोलावलं, पती सोबत विवस्त्र केलं आणि स्क्रूड्रायव्हरनं...

प्रतिभा शिंदे या लोक संघर्ष मोर्चाच्या संस्थापिका आहेत. त्यांनी या माध्यमातून आदिवासी समाजासाठी अनेक आंदोलन केली आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. गेल्या दीड वर्षांपूर्वी त्यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राहुल गांधी यांनी त्यांची काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली होती. पण आता त्यांना काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com