
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यां विरोधात कडक कायदा आणावा. त्यांना दहा वर्षाची शिक्षा करावी. गुन्हा हा अजामीन पात्र करावा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी केंद्रय गृह मंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. हा कायदा केंद्र आणि राज्यसरकारांनी करावा अशी त्यांनी मागणी केली होती. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी उदयन राजे यांनाच डिवचले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उदयन राजे हे भाजपमध्ये आहे. त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबाबत जे काही लिहीले आहे त्याबाबत राजेंनी बोललं पाहीजे. असं हर्षवर्धन सकपाळ म्हणावे. बंच ऑफ थॉट्समध्ये महाराजांबाबत काय लिहीलं आहे अशी विचारणा ही त्यांनी उदयन राजे यांना केली आहे. त्यामुळे तुम्ही या पुस्तकाची होळी करणार आहात का असा सवालही त्यांनी केला आहे. उदयनराजे ज्या पक्षात आहेत, त्या पक्षातल्या जबाबदार लोकांच्या लिखाणाबाबत उदयनराजे कधी बोलणार असं ही ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्यांच्या विचारांच्या मुशीतूनच भाजपा पक्ष तयार झाला आहे, असा आरोप सकपाळ यांनी केला. अशा पक्षात उदयनराजे आणि त्यांचे बंधू मंत्री म्हणून राहणार असतील तर हा दुःख:चा विषय आहे. भाजप संविधानावर नव्हे, तर गोळवलकर गुरुजींनी लिहिलेल्या बंच ऑफ थॉट्स या पुस्तकावर चालतो. त्यांचा त्यावरच विश्वास आहे. या पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह, अपमानास्पद उल्लेख आहे, याची आठवण या निमित्ताने सकपाळ यांनी राजेंना करून दिली.
सावरकरांनीही अशाच स्वरूपाचं लिखाण छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलं आहे. ते उदयन राजे यांना मान्य आहे का असा प्रश्न ही त्यांनी यावेळी केला. उदयनराजे हे बंच ऑफ थॉट्स पुस्तकाची होळी करणार का? सावरकरांसारखं विकृत लिखाण करणाऱ्यांचं समर्थन करणाऱ्या पक्षात ते राहणार का? असे एकामागून एक प्रश्न त्यांनी खासदार उदयन राजे यांना केले आहेत. त्यामुळे राजे आता या प्रश्नांना कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world