जाहिरात

कोल्हापूरमध्ये भाजपाला मोठा धक्का, फडणवीसांच्या जवळचा नेता हाती घेणार तुतारी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे जिल्ह्याते बडे नेते समरजीत सिंग घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत,

कोल्हापूरमध्ये भाजपाला मोठा धक्का, फडणवीसांच्या जवळचा नेता हाती घेणार तुतारी
कोल्हापूर:

विशाल पुजारी, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे जिल्ह्याते बडे नेते समरजीत सिंग घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत,  यावेळी आपल्याला तुतारी हातात घ्यायचा निर्णय घ्यावा लागणार आहे, असं घाटगे यांनी कार्यकर्त्यांच्याै मेळाव्यात  जाहीर केलं. समरजीत सिंह घाटगे यांचा भाजपला राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

फडणवीसांना दिली कल्पना

'दोन महिने थांबणायची तयारी ठेवा, पुढची 25 वर्षे आपली आहेत. कागलमध्ये स्वराज्य मिळवायचं, जयंत पाटील यांच्याशी बोलून निर्णय जाहीर करणार आहे. मी माझ्या नेत्याला भेटून बोलून आलो  देवेंद्र फडणवीस यांना भेटून मी माझा निर्णय सांगितला आहे. 8 जून नंतर मी कागलच्या स्वराज्यासाठी काम करणार सांगितलेलं होतं. 7 जून पर्यंत पक्षाशी एकनिष्ठ होतो.आता मला निर्णय घ्यावाच लागणार आहे. हा निर्णय स्वर्गीय राजेसाहेबांसाठी आहे. कुणी कितीही ताकद वापरली तरी हरकत नाही, असं घाटगे यांनी सांगितलं. 

समरजीत घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते मानले जातात. ते कागल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून  मागील विधानसभा निवडणूक लढवली होती. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसन मुश्रीफ यांनी त्यांचा पराभव केला. यंदा मुश्रीफ अजित पवारांसोबत असल्यानं महायुतीमध्ये आहेत. अजित पवारांनी त्यांची उमेदवारीही जाहीर केलीय.  त्यामुळे घाटगे यांनी भाजपाची साथ सोडून शरद पवारांकडं जाण्याचा निर्णय घेतलाय. 

( नक्की वाचा : '... तर त्याच क्षणी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल', देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य )
 

शरद पवार 3 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.  यावेळी ते कागलच्या गैबी चौकात सभा घेणार आहे. याच सभेत  समरजीत घाटगे  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. घाटगे शरद पवारांसोबत गेल्यानं यंदा कागलची निवडणूक चुरशीची होणार आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com