जाहिरात

यशश्रीची हत्या अन् लव्ह जिहाद, शर्मिला ठाकरेंचा संताप अनावर, का भडकल्या?

यशश्रीची हत्या अन् लव्ह जिहाद, शर्मिला ठाकरेंचा संताप अनावर, का भडकल्या?
नवी मुंबई:

उरणमध्ये यशश्री शिंदे हिची हत्या करण्यात आली. त्याआधी नवी मुंबईत  शिळफाटा येथे विवाहीतेवर अत्याचार करून तिचीही हत्या करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मनसे नेत्या आणि राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे  यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय त्यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेत, जरा पोलिसांची दहशत दिसू द्या, असेही सुनावले आहे. उरण हत्येत लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. यावरही शर्मिला ठाकरे यांनी परखड मत व्यक्त केले आहे. शिवाय शिळफाटा इथं झालेल्या प्रकरणावरही त्यांनी आपला राग आणि संताप व्यक्त केला आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'तुम्ही तुमची दहशत दाखवा' 

काही दिवसांपूर्वी शिळफाटा येथे नवी मुंबईच्या लेकीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. नंतर उरणमध्ये एका मुलीची दुर्दैवी हत्या झाली. राज्यात अशा घटना वारंवार घडत आहे. राज्यातल्या महिला,लेकी सुरक्षित नाहीत. अशा वेळी पोलिसांनी त्यांची दहशत दाखवणे गरजेचे आहे. त्या शिवाय या नराधमांना चाप बसणार नाही. या आरोपी नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा देऊन या लेकींना न्याय द्यावा, या मागणीसाठी शर्मिला ठाकरे या नवी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयावर धडकल्या होत्या. या प्रकरणात कोणीही राजकीय हस्तक्षेप करणार नाही. पोलिसांनी आपली ताकद आणि दहशत दाखवली पाहीजे. ही दहशत तुम्ही जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत हे नराधम थांबणार नाही असेही ठाकरे यावेळी म्हणाल्या. त्यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारांबे यांची भेट घेवून आपला संताप व्यक्त केला. 

ट्रेंडिंग बातमी -  यशश्री इच्छेने दाऊदला भेटायला गेली होती? पोलिसांच्या पत्रकार परिषदेनंतर उरण हत्याकांडांला वेगळं वळण  

'शक्ती कायदा लागू करा' 

शक्ती कायदा तातडीने लागू करावा अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. या काद्यातून नराधमांना कोणतीच सुट आणि संधी मिळायला नको असं ही त्या म्हणाले. अशा विकृतीच्या लोकांना आयुष्यभर जेलमध्ये ठेवणे गरजे आहे. खरं तर त्यांना फाशीच दिली पाहीजे अशी आपली भावना असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. महिलांवर होत असलेल्या अत्याचार प्रकरणी मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी थेट शर्मिला ठाकरे या स्वत: मैदानात उतरल्या आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - साध्या वेशात पोलिसांनी नराधम दाऊदच्या आवळल्या मुसक्या; यशश्री हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट

लव्ह जिहाद की अजून काही?

उरणमध्ये यशश्री शिंदे या तरूणीची हत्या करण्यात आली. याबाबत शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. हा लव्ह जिहाद वाटतो का? या वर त्यांनी परखड मत व्यक्त केले. या प्रकरणाला कोणताही धार्मिक रंग देवू नका. उरणचं प्रकरण जर लव्ह जिहाद असेल तर शिळफाट्याचं प्रकरण हे मंदिरात घडलं आहे. त्याला तुम्ही काय म्हणणार? ते प्रकरण तर आणखी भयंकर आहे. असे गुन्हे करणाऱ्यांना कोणताही धर्म नसतो. त्याला धार्मिक रंग देणेही चुकीचे आहे. गुन्हा करणार हा गुन्हेगारच असतो. तोच त्याचा धर्म असतो. त्यांना शिक्षा झाली पाहीजे हीच आपली भूमिका असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी स्पष्ट केले.  

ट्रेंडिंग बातमी - सुपारीबाज ते घासलेट चोर... राज ठाकरेंचा पुणै दौरा संपताच मनसे-राष्ट्रवादीत जुंपली

दोघींच्या हत्येने नवी मुंबई हादरली 

6 जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती ताणतणाव असल्याने, सकाळी 10 वाजता शिळफाटा इथं असलेल्या गणेश घोळ मंदिरात गेली होती. तिथे तीन पुजाऱ्यांनी तिला गुंगीचे औषध देवून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून हे तीन पुजारी आले होते. या घटनेनंतर काही दिवसांनी उरणमधील यशश्री शिंदे या 20 वर्षीय तरुणीची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती. आरोपीने तिचे अवयव कापले होते. शिवाय चेहऱ्याचा चेंदामेंदा केला होता. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले होते. 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com