जाहिरात

Eknath Shinde: 'एकनाथ शिंदे कर्णासारखे दानशूर', पवारांच्या आमदाराकडून कौतुक

नातेपुते येथे होलार समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्या वेळी ते बोलत होते.

Eknath Shinde: 'एकनाथ शिंदे कर्णासारखे  दानशूर', पवारांच्या आमदाराकडून कौतुक
सोलापूर:

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयार सर्वच राजकीय पक्षांनी चालवली आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे संघटना वाढवण्यासाठी संपूर्ण राज्यभर फिरत आहेत. त्यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इन कमिंग होतानाही दिसत आहे. आगामी निवडणूक पूर्ण ताकदीने लढवायची ही रणनिती त्यांनी आखली आहे. त्यात त्यांची इमेज देणारा नेता अशी झाली आहे. हे आता त्यांच्या विरोधकांनीही मान्य केले आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांने थेट त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. 

शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी एकनाथ शिंदेवर स्तुतीसुमने उधळली आहे. जानकर म्हणाले की, मी चाळीस वर्षाच्या राजकारणात खूप माणसं पाहिली आहेत. पण एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस पाहीला नाही. ते सगळ्यां पेक्षा वेगळे  आहेत. मी राजकीय कारकिर्दीत अनेक मुख्यमंत्री ही पाहीले. पण त्यातही शिंदे हे वेगळे ठरतात. एकनाथ शिंदे म्हणजे कर्णा सारखे दानशूर माणूस आहे. अशा शब्दात आमदार जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती केली. 

Panvel MNS News: राज ठाकरेंचे भाषण, काही तासात मनसेचे 'खळ-खट्याक'; पनवेलमध्ये लेडीज बार फोडला

नातेपुते येथे होलार समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्या वेळी ते बोलत होते. एकनाथ शिंदे हे ही आपल्या प्रत्येक भाषणात मी देणार आहे. मी घेणारा नाही. आमची देना बँक आहे असं ते वारंवार सांगतात. शिवाय मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी आपली देणारा ही इमेज तयार केली. त्यातूनच लाडकी बहीण सारखी योजना त्यांनी आणली. त्यातून त्यांनी बहीणींना 1500 दर महिना देण्याचा निर्णय घेतला. शिवाय निधी वाटपातही त्यांनी आपल्या आमदारांना सढळ हस्ते मदत केली होती हे ही कुणापासून लपून राहीलेले नाही. 

नक्की वाचा - MNS News: '15 दिवसात डान्सबार बंद करा नाहीत तर...', मनसेचा थेट इशारा

त्यात आता विरोधी पक्षाच्या आमदारानेच शिंदे यांचे कौतूक केले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात राजकीय वर्तूळात वेगळी चर्चा ही सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसात काँग्रेस राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग होताना दिसत आहेत. अशा वेळी राष्ट्रवादीच्या आमदाराने शिंदेंची केलेली स्तुती का? असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान जास्तीत जास्त नेत्यांना आपल्या गोटात ओढण्याची सध्या स्पर्धा सुरू झालेली पाहायला मिळत आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com