जाहिरात

NCP News: शरद पवारांसोबत जाण्याबाबत अजित पवार गटात चर्चा? कारण काय?

अजित पवारांनी आपल्या आमदारांची एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शरद पवारांबरोबर गेल्यास काय होईल याची चाचपणी केली.

NCP News: शरद पवारांसोबत जाण्याबाबत अजित पवार गटात चर्चा? कारण काय?
मुंबई:

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी काधीही लागू शकतात. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये बाजी मारून पक्षाचा पाय स्थानिक पातळीवर भक्कम करण्याचा सर्वांचाच प्रयत्न आहे. त्यातून काही तडजोडी करण्याची तयारी ही राजकीय पक्षांनी चालवली आहे. एकीकडे दोन ठाकरे बंधू एकत्र येताना दिसत आहे. त्यात आता अजित पवारांनीही शरद पवारांबरोबर गेलं पाहीजे का? याबाबत आपल्या आमदारांची मतं जाणून घेतली असल्याचं विश्वसनीय सुत्रांकडून समजत आहे.  

नक्की वाचा - Political news: देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंची बंद दाराआड भेट? शिंदेंचे टेन्शन वाढणार?

अजित पवारांनी आपल्या आमदारांची एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शरद पवारांबरोबर गेल्यास काय होईल याची चाचपणी केली. शिवाय आमदारांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला. शरद पवारांसोबत गेल्यास काय फायदा काय तोटा होईल याची चाचपणी ही त्यांनी केली. तर शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही गट एकत्र आले तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फायदा होईल, अशी माहिती काही आमदारांनी अजित पवारांना दिली. 

नक्की वाचा - Unique wedding: 2 सख्ख्या भावांनी केलं एकाच तरुणीसोबत लग्न, 'या' अनोख्या लग्नाची देशभर चर्चा

स्वतंत्रपणे लढल्यानं ग्राऊंडवरील कार्यकर्ता विभागल्यानं ग्रामीण भागात दोन्ही गटाला फटका बसण्याची शक्यता आहे, असे काही आमदारांनी सांगितलं. त्यामुळे स्थानिक पातळीवर शरद पवारांबरोबर जुळवून घेतलं पाहीजे असंही काहींनी स्पष्ट केलं. तर आता वेगळी भूमीका घेतली आहे तर त्यांच्या बरोबर जाण्यास काय अर्थ आहे असं ही मत व्यक्त केलं. दरम्यान अशी कोणतीही चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकी झाली नसल्याचं प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com