पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लखपती दीदी या कार्यक्रमासाठी जळगावात आले होते. पण या कार्यक्रमात ते महाराष्ट्रात होत असलेल्या महिला अत्याचारावर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाषणाच्या सुरूवातीला ते लखपती दीदी प्रमाणे अन्य योजनावर बोलले. भाषणाच्या शेवटी मात्र त्यांनी महिला अत्याचारावर भाष्य केले. महिलांवर अत्याचार हे अक्षम्य पाप आहे. जो कोणी ही कृती करेल त्याला कडक शिक्षा झालीच पाहीजे. शिवाय त्याला वाचवणाऱ्यालाही शिक्षा झाली पाहीजे असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सरकार येईल जाईल पण त्या काळात महिलांची रक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले परखड मत मांडले. देशातल्या प्रत्येत सरकारला त्यांनी आवाहन केले. लागेल ती मदत केंद्र सरकार करेल असे सांगितले. शिवाय महिलांवर होणारे अत्याचार हा अक्षम्य पाप असल्याचे सांगितले. यात जो कोणी दोषी असेल तो कोणत्याही स्थिती वाचल नाही पाहीजे. शिवाय दोषीला जे कोणी मदत करत असतील ते ही तितकेच दोषी आहेत. मग ते रुग्णालय असो शाळा असो ऑफीस असो पोलीस असो ज्या स्तरावर चुक झाली असेल त्या सर्वांचा हिशोब झाला पाहीजे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - मोठी बातमी! मविआचं जागा वाटप ठरलं, मुंबईतल्या 99 टक्के जागांवर सहमती
प्रत्येकाला स्पष्ट मेसेज गेला पाहीजे. चुकीला माफी नाही अशा शब्दात आपल्या भावना मोदींनी व्यक्त केल्या. कोणाचेही सरकार असेल तरी महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा देण्यासाठी कायदेही कडक करत आहोत असे मोदी यावेळी म्हणाले. पुर्वी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही घेतली जात नव्हती. घेतली तर कोर्टातही वेळ लावला जात होता. त्यातल्या अडचणी मोदी सरकारने दुर केल्या आहेत असे ते म्हणाले. महिला आणि मुलींना न्याय देणारे कायदे तयार करत आहोत. जर कोणाला पोलीस स्टेशनमध्ये न जाता तक्रार दाखल करायची आहे तर ई एफआयआर करू शकतात. त्यात कोणीही छेडछाड करणार नाही असेही मोदी यावेळी म्हणाले. काही घटनांमध्ये आरोपी हे अल्पवयीन असतात त्यांना फाशी आणि जन्मठेप सारखी शिक्षा व्हावी यासाठी कायदा करणार असल्याचे मोदी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - लखपती दीदींसाठी मोदी आज जळगावात, एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत अखेर पूर्णविराम!
लग्नाची वचने दिली जातात. त्यानंतर फसवणूक केली जाते. अशा पद्धतीने खोटे सांगून फसवणूक करणाऱ्यांनाही कठोर शिक्षेची तरतूद केली जाईल असे ते म्हणाले. महिलां वरील आत्याचार रोखणे ही आपल्या सर्वांची जाबाबदारी आहे. त्यासाठी सर्व राज्य सरकारां बरोबर केंद्र सरकार सहकार्य करेल असेही त्यांनी स्पष्ट केले. हे पाप आपल्या सर्वांना मिटवायचे आहे. महिलांसाठी मोदी सरकार मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचे यावेळी मोदी म्हणाले. त्यांना सक्षम करणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे ही त्यांनी सांगितले. त्यासाठी राज्यातील महायुती सरकारही काम करत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी नव नविन योजना आणल्या आहेत असेही यावेळी मोदी म्हणाले.
भाषणाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीला साथ देण्याचे आवाहन केले. महायुती म्हणजे तुमच्या भवितव्याची गॅरंटी असही ते यावेळी म्हणाले. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे.जगात महाराष्ट्राचे नाव आहे. जगभरातील गुंतवणुकदार हे महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे महाराष्ट्राल महायुती सरकारची गरज आहे. त्यामुळे मला विश्वास आहे राज्यात स्थिरता आणि समृद्धीसाठी तुम्ही महायुतीला साथ द्याल असे मोदी यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world