
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आपसात भिडल्याची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद आता उमटले आहेत. पक्षाने कारवाई करीत कल्याणमधील सर्व उपशहर प्रमुख पदापर्यंतची पदे बरखास्त केली आहेत. याची महिती शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी प्रशांत काळे यांनी दिली आहे. राड्या दरम्यान काही लोकांनी पद नसताना त्यांनी आपल्याकडे पद असल्याची माहिती दिली होती. खरे तर या दोन्ही प्रकरणात ज्यांनी स्वत:कडे पद असल्याचा दावा केला होता. त्यांच्याकडे कोणतेही पद नव्हते. आता पुन्हा उपशहर प्रमुखसह बाकी सर्व पदांसाठी मुलाखती होणार आहेत. त्यानंतर पुढील पदे नियुक्त केली जातील, असा निर्णय आता पक्षाने घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याणमध्ये शिंदे गटाच्या राडा झाला होता. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी राणी कपोते यांनी शिंदे गटाचे उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांना मारहाण केली होती. या मारहाणीनंतर कपोते आणि उगले या दोघांच्या विरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उगले यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर कपोते यांना अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर पाणी प्रश्नावर कल्याण पूर्वेत शिंदे गटाचे पदाधिकरी दिलीप दाखिनकर यांना पोलिस ठाण्यातील स्वागतकक्षात शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख मल्लेश शेट्टी यांनी मारहाण केली होती. त्यात दाखिनकर यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची घटना घडली.
या प्रकरणात कपोते यांनी त्या पक्षाच्या पदाधिकरी असल्याचा दावा केला होता. तर दाखिनकर यांनीही पक्षाचे पदाधिकारी असल्याचा दावा केला होता. त्यामुळे पक्षात संभ्रम निर्माण झाला. अशा स्थितीत कल्याणमधील मोठ्या नेत्यांनी पक्षाकडे मागणी केली की पदं असल्याचा दावा करणाऱ्या लोकांकडे पद आहे की नाही हे स्पष्ट झाले पाहिजे. त्यानतंतर शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी कल्याण पूर्वेतील सर्व उपशहरप्रमुख पदांना स्थगिती दिली आहे. नव्याने मुलाखती घेऊन पुन्हा या नेमणूका केल्या जातील असे स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world