जाहिरात

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला? 'या' नेत्यांची नावं चर्चेत

State Cabinet Expansion : गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला? 'या' नेत्यांची नावं चर्चेत
मुंबई:

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विधीमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. राज्य विधिमंडळाचं अधिवेशन 12 जुलैपर्यंत आहे. त्याच दिवशी विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कुणाला मिळणार संधी?

विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत. या निवडणुकीपूर्वी हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असल्यानं यामध्ये नव्या मंत्र्यांचा समावेश करताना महायुतीमधील तिन्ही पक्षांना कसरत करावी लागणार आहे.

राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्री म्हणून पंकजा मुंडे, भरत गोगावले,  संजय शिरसाट, नितेश राणे, रणधीर सावरकर, जयकुमार रावल, जयकुमार गोरे, विजय देशमुख, गोपीचंद पडळकर, मकरंद पाटील  यांच्या नावाची चर्चा आहे. 

( नक्की वाचा : विधानपरिषद निवडणुकीत कुणाचा होणार गेम? कोणता उमेदवार धोक्यात? आकडेवारीसह समजून घ्या समीकरण )
 

भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विभाग, जातीय समीकरणं आणि विभागवार प्रतिनिधित्वाचा विचार करुन नव्या मंत्र्यांचा समावेश होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार कुणाला संधी देणार? या मंत्रिमंडळातील सरप्राईज चेहरा कोण असेल? कुणाला पुन्हा एकदा निराशा सहन करावी लागणार? या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
मुंबईमध्ये महायुतीत मोठा भाऊ कोण? शिंदेंची सेना की भाजप? राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा?
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला? 'या' नेत्यांची नावं चर्चेत
After Akshay Shinde encounter poster of Devendra Fadnavis Badla Pura went viral
Next Article
'बदला' पुरा! अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर फडणवीसांचा तो फोटो व्हायरल; पोस्टरची मुंबईभर चर्चा!