जाहिरात

'अजित पवारांना बारामती कळलीच नाही', सुप्रिया सुळेंनी सांगितलं विजयाचं रहस्य!

Supriya Sule Exclusive : 18 वर्ष पालकमंत्री राहिलेल्या अजित पवारांना बारामती कळलीच नाही, असा दावा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय

'अजित पवारांना बारामती कळलीच नाही', सुप्रिया सुळेंनी सांगितलं विजयाचं रहस्य!
Supriya Sule Ajit Pawar
पुणे:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

Supriya Sule Exclusive : 18 वर्ष पालकमंत्री राहिलेल्या अजित पवारांना बारामती कळलीच नाही, असा दावा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. NDTV मराठीला सुप्रिया सुळे यांनी खास मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी अजित पवारांसह भाजपावर निशाणा साधला. भाजपासाठी अजित पवार यांची उपयुक्तता संपलीय, असा टोला त्यांनी लगावला.

बारामती लोकसभा निवडणुकीकडं (Baramati Lok Sabha Election 2024) यंदा संपूर्ण देशाचं लक्ष होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या होत्या. नणंद-भावजयीमध्ये झालेल्या या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. या निवडणूक निकालावर NDTV मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी सविस्तर विश्लेषण केलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बारामती मतदारसंघ हा मला किंवा अजित पवारांना समजत नाही तो फक्त शरद पवारांना समजतो, हे माझं या निवडणुकीनंतर ठाम मत झालंय. चिन्ह, पक्ष, नेते, कार्यकर्ते, संस्था सर्व त्यांच्या बाजूला होती. आमच्याकडं काहीही नव्हतं. आम्ही फकिर होतं. बारामतीमध्ये कार्यकर्त्यांची सुरुवात चारपासून झाली आणि त्यानंतर कारवाँ बढ गया. हा कारवाँ मी 18 वर्षात कधीच पाहिला नव्हता. ही निवडणूक पूर्णपणे लोकांनी हातामध्ये घेतली होती. बाकीच्या तालुक्यांमध्ये इतकं प्रेम मिळेल असं मला वाटलं नाही. या विजयानं माझ्यावरची जबाबदारी वाढलीय. मी मतदारांची कृतज्ञ आहे, असं सुळे यांनी सांगितलं.

( नक्की वाचा : 'छत्रपती' वरुन शरद पवारांचं अजित पवारांना खुलं आव्हान )
 

शरद पवारांची या मतदारसंघात भावनिक गुंतवणूक आहे. मी देखील या विजयाबाबत साशंक होते. दूधसंघ, कारखाना, बँक, सर्व यंत्रणा त्यांच्याकडं होती. 18 वर्ष ते पालकमंत्री होते. पण, बारामती आणि शिरुर हे दोन्ही मतदारसंघ शरद पवारांनाच कळतात. मला किंवा अमोल कोल्हे यांना कळत नाही. अजित पवारांनी नंतर तर शिरुर मतदारसंघ सोडून दिला होता. ते सलग 42 दिवस बारामतीमध्ये होते. पण, ही निवडणूक लोकांनीच हाती घेतली होती, असं सुळे यांनी सांगितलं. 

आमचा विजय हा फॉल्स नरेटिव्हवर नाही, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. राज्य घटना बदलणं हा त्यांचा छुपा अजेंडा आहे, असंही त्यांनी या मुलाखतीमध्ये  स्पष्ट केलं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com