मुंबईतील विधानसभा जागांसाठी ठाकरे पोहोचले केजरीवालांच्या घरी?  'आप' मविआत सामील होणार? 

काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागा लढवण्याची घोषणा केली होती. 

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

उद्धव ठाकरेंचा आज दिल्ली दौऱ्याचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज सायंकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे हे सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी ते अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊतही आहेत. 

काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागा लढवण्याची घोषणा केली होती. आम आदमी पक्षाने राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं आहे. मुंबईतील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याची तयारी सुरू केली आहे. आम आदमी पक्ष हा मुंबईतील 36 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीबरोबरच 'आप'ला महाविकास आघाडीत सामील करून घेण्यासाठी ही भेट होती का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. आम आदमी पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावी हादेखील या दिल्ली दौऱ्याचा एक मुद्दा असू शकतो. 

Advertisement

आज दिल्ली दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी उपराष्ट्रपती जयदीप धनखर यांची भेट घेतली. त्यानंतर ते केजरीवालांच्या निवासस्थानी पोहोचले. उद्धव ठाकरेंचा आज दिल्ली दौऱ्याचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे.. काल 7 ऑगस्ट रोजी त्यांनी  शरद पवार, राहुल गांधी, शाहु महाराज, मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली. आज सायंकाळी 5 वाजता 10 जनपथ येथे ते सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. 

Advertisement

नक्की वाचा - बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना कधी आणणार? मुख्यमंत्र्यांची परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा

उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात जागावाटपावरून चर्चा 
उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीदौऱ्यादरम्यान विधानसभा जागावाटपावरून चर्चा झाल्याची माहिती आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि उद्धव ठाकरे यांच्यात विधानसभा जागावाटपावरून चर्चा झाली. 10 सप्टेंबरच्या आत जागावाटप पूर्ण व्हायला हवं, अशी इच्छा उद्धव ठाकरेंनी खरगेंकडे व्यक्त केली. 
मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर जागावाटप करावे अशी इच्छा व्यक्त केली. जागावाटप लवकर पूर्ण झालं तर प्रचाराला जास्त वेळ मिळेल. काही जागांची अडचण असेल तर वरिष्ठ नेते बसून तोडगा काढू, पण निर्णय लवकर घ्यावा. आधी लढलेल्या जागांमध्ये अदलाबदल करण्याची गरज पडल्यास त्यावर तिन्ही पक्षातील नेत्यांचं एकमत व्हावं यासाठी प्रयत्न केला जावा. शिवाय लोकसभेत झालेल्या चूका कशा टाळता येतील यावरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Advertisement