लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर आता भाजप विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. या पार्श्वभूमीवर भाजचे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी भाजपचे राज्यभरातून कार्यकर्ते पुण्यात दाखल झाले आहेत. या निमित्ताने महायुतीत अजित पवार असायला हवे की नाही? याबाबत भाजप कार्यकर्त्यांनी आपली स्पष्ट मतं मांडली आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या भावनांचा आदर पक्षश्रेष्ठी करणार का? याचे उत्तर या अधिवेशनातून मिळणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभेतील भाजपच्या पराभवाला अजित पवार जबाबदार असल्याची चर्चा होत आहे. त्याच वेळी अजित पवार महायुतीत नकोत अशी भावनाही अनेक कार्यकर्त्यांना याआधी वर्तवली आहे. आता भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यात आहे. त्याच पुण्यात अजित पवारांचे वर्चस्व आहे. इथं जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांबाबत स्पष्ट मत मांडले आहे. काहीनी तटस्थेची भूमिका मांडली आहे. तर काहींनी थेट अजित पवारांनाच लक्ष केले आहे. तर काहींनी पक्षश्रेष्ठींवर सर्व काही सोपवलं आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भारतीय जनता पार्टी समोरचे आव्हानं पक्ष कार्यकर्त्यांना पूर्ण माहिती आहे. ते आपल्या पक्ष नेतृत्वापर्यंत आपलं म्हणणं मांडू इच्छित आहे. पण त्यांना माहिती नाही की ते व्यासपीठ कुठे आहे. परभणी जिल्ह्यातल्या पक्ष कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाचा का पराभव झाला आणि विधानसभा निवडणुकीत आव्हान किती मोठा आहे त्याची मांडणी केली आहे. पक्ष कार्यकर्त्यांना वाटतं अजित पवारांच्या पक्षाची मतं आपल्याला मिळालेली नाहीत. विधानसभेलाही मिळणार नाहीत असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आजही अजित पवारां विषयी आडी आहे.
ट्रेंडिंग बातमी - भाजपचं ठरलं! 'संघटन हीच शक्ती, मनामनात राष्ट्रभक्ती'
अजित पवारांना बरोबर घेण्यास काहीच अडचण नाही असे काही भाजप कार्यकर्त्यांना वाटत आहे. वरिष्ठ पातळीवर जे निर्णय होतात ते मान्य करावे लागतात असेही त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक सोपी नाही असेही काही कार्यकर्त्यांनी मत मांडले आहे. महाविकास आघाडीने चांगले आव्हान उभे केले आहे. पण लाडकी बहिण योजना, जेष्ठांसाठी योजना सरकारने आणली आहे. सरकारने कामाचा धडाका लावला आहे. त्यामुळे विधानसभेला तेवढी अडचण येणार नाही असे काहींना वाटते.
(नक्की वाचा- उद्धव ठाकरेंची विधानसभेसाठीची रणनिती ठरली; संपर्कप्रमुखांना दिले महत्त्वाचे निर्देश)
काही कार्यकर्ते हे अधिवेशन उर्जा देणारे असेल असे वाटते. ही उर्जा घेवून मतदार संघात जाणार असल्याचे ते सांगतात. जी उर्जा मिळेल ती सकारात्मक असेल. सरकारने आणलेल्या योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहचवणार असेही ते सांगतात. लोकसभा निवडणूकीत नरेटिव्ह सेट केले गेले. त्यामुळे लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केले. त्याबाबत पक्षाने आत्मचिंतन केले आहे. लढाई सोपी नाही. पण भाजप कार्यकर्ते पुर्ण ताकदीने मैदानात उतरतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world