
IPL Schedule 2025: क्रिडाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या 18 व्या मोसमाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या सर्व सामन्यांचे ठिकाण, संघ आणि तारखा जाहीर केल्या आहेत. 22 मार्चपासून आयपीएलच्या थराराला सुरुवात होणार असून गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर खेळवला जाणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक!
22 मार्च पासून आयपीएलच्या थराराला सुरुवात होणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डनवर गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये पहिला सामना होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, 23 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुपारी 3.30 वाजता खेळला जाईल. त्याच दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एक ब्लॉकबस्टर सामना होईल.
आयपीएलमध्ये चेन्नई, मुंबई आणि बंगळुरू या संघांचा चाहतावर्ग सर्वात जास्त आहे. या तिन्ही संघांच्या सामन्यांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. हे लक्षात घेऊन बीसीसीआयने आरसीबी आणि एमआय विरुद्ध सीएसकेसाठी प्रत्येकी दोन सामने नियोजित केले आहेत. चेन्नई संघ 23 मार्च रोजी चेपॉक येथे पहिल्यांदाच मुंबईचा सामना करेल. 20 एप्रिल रोजी दोन्ही संघ वानखेडेवर एकमेकांसमोर येतील. सीएसकेचा आरसीबी विरुद्धचा पहिला सामना 28 मार्च रोजी चेपॉक येथे खेळला जाईल, तर दोन्ही संघांमधील दुसरा सामना 3 मे रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल.
Mark your calendars, folks! 🥳🗓#TATAIPL 2025 kicks off on March 2️⃣2️⃣ with a clash between @KKRiders and @RCBTweets 🤜🤛
— IndianPremierLeague (@IPL) February 16, 2025
When is your favourite team's first match? 🤔 pic.twitter.com/f2tf3YcSyY
ट्रेंडिंग बातमी - HoneyTrap: हनी ट्रॅप म्हणजे काय? तो कोणासाठी असतो? या ट्रॅपमध्ये 'ते' कसे अडकतात?
आयपीएल 2025 मध्ये 70 ग्रुप स्टेज सामने होतील. यानंतर, लीगमधील अव्वल 4 संघ प्लेऑफसाठी स्पर्धा करतील. यावेळी प्लेऑफमधील पहिला सामना म्हणजेच क्वालिफायर-1 20 मे रोजी खेळला जाईल. एलिमिनेटर सामना 21 मे रोजी होईल, तर क्वालिफायर-2 चा सामना 23 मे रोजी होईल. त्यानंतर 25 मे रोजी फायनलच्या सामन्यासाठी दोन संघ अंतिम फेरीत जेतेपदासाठी लढतील.
कोणी किती वेळा विजेतेपद जिंकले?
आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली. तेव्हापासून, त्याचे 17 हंगाम खेळले गेले आहेत. या इंडियन टी-20 लीगमधील सर्वात यशस्वी संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स अव्वल स्थानावर आहेत. दोघांनीही पाच वेळा हे विजेतेपद जिंकले आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने ही ट्रॉफी 3वेळा जिंकली आहे. राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर्स, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांनीही प्रत्येकी एकदा चॅम्पियन होण्यात यश मिळवले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world