जाहिरात

ऋषभ पंत दिल्लीची साथ सोडणार? मोठी अपडेट आली समोर

Rishabh Pant : ऋषभ पंत दिल्ली संघासोबत 2016 पासून जोडलेला आहे. दिल्ली सोबत येण्याआधी ऋषभ पंतने अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं होते.याच कामगिरीच्या जोरावर दिल्ली संघाने ऋषभ पंतला आपल्यासोबत जोडून घेतलं होतं.

ऋषभ पंत दिल्लीची साथ सोडणार? मोठी अपडेट आली समोर

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत चेन्नई सुपरकिंग्समध्ये सामील होऊ शकतो, असे अंदाज गेल्या काही दिवसांपासून बांधले जात आहेत. मात्र या चर्चा केवळ अफवा असल्याचं हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. IANS च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत दिल्ली संघासोबत राहणार असल्याची माहिती मिळत आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली कॅपिटल्स फ्रॅन्चाजझी आगामी सीजनसाटी तीन खेळाडूंना रिटेन करण्याच्या तयारीत आहेत. याबाबतचा निर्णय देखील जवळपास झाला आहे. दिल्लीकडून रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार ऋषभ पंत, अक्षर पटेल, कुलदीप यादव यांचा समावेश असू शकतो.

दिल्लीचे हे तीन खेळाडू विश्वविजेत्या टी 20 संघाचा देखील भाग होते. तेथे तिन्ही खेळाडूंच प्रदर्शन दमदार राहिलं. त्यामुळे या खेळाडूंना रिटेन करण्याचा फ्रेन्चायझींचा निर्णय बरोबर दिसून येत आहे. 

(नक्की वाचा - BCCI नं वाढवली मुंबई इंडियन्सची डोकेदुखी, पुढच्या सिझनमध्ये काय होणार?)

ऋषभ पंत आणि दिल्ली

ऋषभ पंत दिल्ली संघासोबत 2016 पासून जोडलेला आहे. दिल्ली सोबत येण्याआधी ऋषभ पंतने अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं होते.याच कामगिरीच्या जोरावर दिल्ली संघाने ऋषभ पंतला आपल्यासोबत जोडून घेतलं होतं. तेव्हापासून ऋषभ पंत दिल्लीसोबतच आहे.

( नक्की वाचा : हार्दिक आणि नताशानं केली घटस्फोटाची अधिकृत घोषणा, मुलाच्या संगोपनाबाबत घेतला निर्णय )

ऋषभ पंतने आयपीएलमध्ये 111 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 3284 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये ऋषभ पंतच्या नावे 1 शतक आणि 18 शतके आहेत.  त्यामुळे एवढ्या तगड्या खेळाडूला दिल्ली सहजासहजी सोडेल असं वाटत नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com