
Dewald Brevis Brilliant Catch : आयपीएल 2025 मधील एका मॅचमध्ये बेबी डीव्हिलियर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसनं एक जबरदस्त कॅच घेत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. आयपीएलमध्ये 49 वा सामना बुधवारी (30 एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) यांच्यात झाला. या मॅचमध्ये ब्रेविसनं हा जबरदस्त कॅच घेतला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कसा घेतला कॅच?
पंजाबच्या इनिंगमधील अठरावी ओव्हर रविंद्र जडेजा टाकत होता. त्यावेळी शशांक सिंहनं एक जोरदार फटका लगावला. शंशाकनं मारलेला फटका सिक्सला जाणार असाच सर्वांचा अंदाज होता. पण, डीप मिडविकेटवर उभा असलेल्या ब्रेविसनं जबरदस्त कॅच घेत शशांकला निराश केलं.
या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. त्यामध्ये बॉल पकडताना ब्रेव्हिस त्याचं संतुलन गमावतो. त्यानंतर तो बाऊंड्री लाईनच्या बाहेर जातो. त्यावेळी प्रसांगवधान राखून तो बॉल वेगानं मैदानाच्या दिशेनं फेकतो. त्यानंतर पुन्हा मैदानात येऊन कॅच पकडतो. यावेळी त्याचं पुन्हा संतुलन जातं. पण, त्यानंतर पुन्हा एकदा तो बॉल मैदानाच्या दिशेनं फेकतो. त्यानंतर पुन्हा मैदानात येऊन कॅच पकडला.
WHAT. A. CATCH 🔥
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2025
An absolute stunner from Dewald Brevis at the boundary😍
Excellent awareness from him 🫡
Updates ▶ https://t.co/eXWTTv7Xhd #TATAIPL | #CSKvPBKS | @ChennaiIPL pic.twitter.com/CjZgjdEvUQ
आऊट होण्यापूर्वी शंशाक सिंहनं पाचव्या क्रमांकावर बॅटींग करताना 23 रन काढले. शशांकनं फक्त 12 बॉलमध्ये 191.67 च्या स्ट्राईक रेटनं हे रन काढले. या खेळीत त्यानं एक फोर आणि दोन सिक्स लगावले.
धोनीनं केलं कौतुक
पंजाब किंग्जनं हा सामना 5 विकेट्सनं जिंकला. पंजाब विरुद्ध झालेल्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. सीएसके आयपीएल 2025 मधून बाहेर पडलेली पहिली टीम बनली आहे.
( नक्की वाचा : Yuzvendra Chahal : W, W, W युजवेंद्र चहलची CSK विरुद्ध सनसनाटी हॅटट्रिक, पाहा Video )
सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं मॅचनंतर बोलताना आम्ही 15 रन कमी बनवले, असं सांगितलं. सॅम करन आणि डेवाल्ड ब्रेविसनं चांगली पार्टनरशिप केली. ब्रेविसनं रनरेट वाढवला. तो एक चांगला फिल्डर देखील आहे. तो टीमचा उत्साह वाढवतो. तो ज्या पद्धतीनं खेळतोय ते पाहता टीमसाठी भविष्यात महत्त्वाचा खेळाडू ठरु शकतो,' असं धोनी म्हणाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world