जाहिरात

इंग्लंडचा दिग्गज ऑलराऊंडर मोईन अलीची निवृत्तीची घोषणा

2014 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मोईनने इंग्लंडकडून अष्टपैलू म्हणून 68 कसोटी, 138 एकदिवसीय आणि 92 टी-20 सामने खेळले.

इंग्लंडचा दिग्गज ऑलराऊंडर मोईन अलीची निवृत्तीची घोषणा

इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून वगळल्यानंतर मोईन अलीने आपला निर्णय जाहीर केला आहे . टी 20 वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत मोईन अलीने भारताविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. 

डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत मोईनने म्हटलं की, "मी 37 वर्षांचा झालो आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे, टी 20 मालिकेसाठी माझी निवड झाली नाही. मी इंग्लंडसाठी खूप क्रिकेट खेळलो आहे आणि आता पुढच्या पिढीची वेळ आली आहे. मला वाटले की ही योग्य वेळ आहे." 

"मला खूप अभिमान आहे. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा खेळता तेव्हा तुम्हाला किती सामने खेळायचे आहेत हे माहीत नसते. तरीही जवळपास 300 सामने खेळलो. माझी पहिली काही वर्षे कसोटी क्रिकेटच्या आसपास होती. जेव्हा इऑन मॉर्गनने नेतृत्व स्वीकारला तेव्हा एकदिवसीय क्रिकेटमध्येही मी खेळलो, तो अनुभव आणखी मजेदार होता", असं मोईन अलीने म्हटलं. 

(नक्की वाचा - उंचीवरुन लोक चिडवायचे, मात्र नीरज चोप्रामुळे आयुष्याला मिळाली कलाटणी; नवदीपने थेट गोल्ड मिळवलं!)

मोईन अलीची कारकीर्द

2014 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मोईनने इंग्लंडकडून अष्टपैलू म्हणून 68 कसोटी, 138 एकदिवसीय आणि 92 टी-20 सामने खेळले. इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोईनने 6678 धावा, 8 शतके, 28 अर्धशतके आणि 366 विकेट्स घेतल्या आहे.

(Video : एका ओव्हरमध्ये 39 रन! युवराज सिंहचा रेकॉर्ड तुटला, अनोळखी खेळाडूची सनसनाटी कामगिरी)

गेल्या वर्षी ॲशेसनंतर दुसऱ्यांदा त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सर्वप्रथम, त्याने सप्टेंबर 2021 मध्ये भारताविरुद्धच्या मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. पण, कर्णधार बेन स्टोक्स, मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम आणि व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याने आपला निर्णय बदलला आणि गेल्या वर्षीच्या ऍशेससाठी इंग्लंडच्या पुरुष कसोटी संघात सामील झाला.मोईन फ्रँचायझी क्रिकेट खेळणे सुरूच ठेवणार असून कोचिंगमध्येही करिअर करण्याचा त्याचा मानस आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
उंचीवरुन लोक चिडवायचे, मात्र नीरज चोप्रामुळे आयुष्याला मिळाली कलाटणी; नवदीपने थेट गोल्ड मिळवलं!
इंग्लंडचा दिग्गज ऑलराऊंडर मोईन अलीची निवृत्तीची घोषणा
ind-vs-ban-who-is-himanshu-singh-called-up-by-team-india-for-bangladesh-test series
Next Article
Himanshu Singh : 21 वर्षांच्या मुंबईकरची का होतीय चर्चा? त्याचं अश्विनशी काय आहे साम्य?