जाहिरात
Story ProgressBack

पराभवग्रस्त RCB च्या अडचणीत वाढ, ग्लेन मॅक्सवेलनं घेतला मोठा निर्णय

Glenn Maxwell In IPL 2024: पॉईंट टेबलमध्ये तळाशी असलेल्या आरसीबीच्या अडचणीत भर पडलीय.

Read Time: 2 min
पराभवग्रस्त RCB च्या अडचणीत वाढ, ग्लेन मॅक्सवेलनं घेतला मोठा निर्णय
Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलच्या निर्णयानं आरसीबीच्या अडचणीत भर पडली आहे. (फोटो - BCCI)
मुंबई:

Glenn Maxwell In IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी (RCB) हा आयपीएल सिझन खराब जातोय. त्यांनी आत्तापर्यंत 7 पैकी फक्त 1 सामना जिंकला असून पॉईंट टेबलमध्ये आरसीबी शेवटच्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध सोमवारी झालेल्या मॅचमध्येही आरसीबीला नामुश्की सहन करावी लागली. सनरायझर्सनं या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना 3 आऊट 287 रन काढले. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वोच्च स्कोअर आहे. आरसीबीनं 288 रनचा पाठलाग करण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यांना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 262 पर्यंत मजल मारता आली.  

सनरायझर्स विरुद्ध झालेल्या सामन्यात आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल खेळू शकला नव्हता. या आयपीएल सिझनमध्ये मॅक्सवेल खराब फॉर्ममध्ये आहे. त्यानं सहा इनिंगमध्ये 5.33 च्या सरासरीनं फक्त 32 रन केले होते. सोमवारच्या मॅचमध्ये तो अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे खेळला नाही, असं मानलं जात होतं. पण, त्याच्या अनुपस्थितीचं खरं कारण आता समोर आलं आहे.

ग्लेन मॅक्सवेलनं या स्पर्धेतून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतलाय. मॅक्सवेलनंच या निर्णयाची माहिती दिलीय. 'माझ्यासाठी हा सोपा निर्णय होता. मी यापूर्वी देखील या परिस्थितीमधून गेलोय. सध्या मला शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची गरज आहे. स्वत:ला फिट करण्याची वेळ आली आहे. या सिझनच्या दरम्यान पुन्हा माझी गरज भासली तर मी फ्रेश मनस्थितीसह परत येईल आणि टीमसाठी माझं योगदान देईल, अशी आशा आहे.' असं मॅक्सवेलनं सांगितलं.

बंगळुरुमध्ये झालेल्या सामन्यात सनरायझर्सकडून ट्रॅव्हिस हेडनं दमदार शतक झळकावलं. त्यानं 41 बॉलमध्ये 102 रन काढले. तर अब्दुल समदनं शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी केली. त्यानं 10 बॉलमध्ये नाबाद 37 रन करत सनरायझर्सला सर्वोच्च स्कोअर गाठून दिला. आरसीबकडून दिनेश कार्तिकनं 35 बॉलमध्ये 83 रनची खेळी केली. पण, तो टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. 

चिन्नास्वामीवर हैदराबादी फलंदाजांचं वादळ, उभारली IPL मधली सर्वोच्च धावसंख्या
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination