India Semi-final scenarios : टी 20 वर्ल्ड कप आता शेवटच्या टप्प्यात आलाय. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन टीम सेमी फायनलमध्ये दाखल झाल्या आहेत. तर यजमान वेस्ट इंडिजचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. टीम इंडिया सुपर 8 मधील शेवटचा सामना सोमवारी (24 जून) रोजी खेळणार आहे. भारतीय टीम या स्पर्धेत आत्तापर्यंत अपराजित आहे. रोहित शर्माच्या ब्रिगेडनं सुपर 8 मधील दोन्ही सामने जिंकले आहेत. पण, त्यानंतरही भारतीय टीमची सेमी फायनलमधील जागा अजून निश्चित झालेली नाही. या स्पर्धेत शेवटच्या टप्प्यातील एक ट्विस्टं भारतीय टीमला स्पर्धेतून बाहेर टाकू शकतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे धोका ?
ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा मोठ्या फरकानं पराभव केला आणि अफगाणिस्ताननं बांगलादेशवर मोठ्या अंतरानं विजय मिळवला तर रन रेटवर टॉप 2 टीम नक्की होतील. सध्या भारतीय टीमचा रनरेट +2.425 आहे. तर ऑस्ट्रेलियाचा +0.223 असून अफगाणिस्तानचा -0.650 आहे. सध्या भारतीय टीम रनरेटमध्ये टॉपवर आहे. पण, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानं काही मोठा चमत्कार केला तर टीम इंडिया रनरेटमध्ये मागं पडू शकते.
... तर टीम इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट!
ऑस्ट्रेलियानं भारतीय टीमला 41 पेक्षा जास्त रननं हरवलं आणि दुसरीकडं अफगाणिस्ताननं बांगलादेशचा 81 पेक्षा जास्त रननं पराभव केला तर नेट रन रेटमध्ये भारतीय टीम या दोन्ही टीमपेक्षा मागं पडू शकते. त्यावेळी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान सेमी फायनमध्ये दाखल होतील. आणि रोहित शर्मा आणि कंपनीला रिकाम्या हातांनी भारतामध्ये परतावं लागेल.
( नक्की वाचा : अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर विजय, अ गटात Super 8 फेरीची शर्यत झाली रंगतदार )
भारत सेमी फायनलमध्ये कसा जाईल?
भारतीय टीमनं ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला तर त्यांना थेट सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळेल. पावसामुळे आजचा सामना रद्द झाला तर दोन्ही टीमना 1-1 पॉईंट मिळेल. त्या परिस्थितीमध्ये भारताकडं 5 आणि ऑस्ट्रेलियाकडं 3 पॉईंट्स होतील. अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत केलं तरी त्यांचे जास्तीत जास्त 4 पॉईंट्स होतील. थोडक्यात पावसामुळे सामना रद्द झाला तर भारतचा सेमी फायनलमध्ये प्रवेश नक्की आहे.
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. T20 क्रिकेटमध्ये तर एक चांगली खेळी, एखादा स्पेलच नाही तर एका बॉलनंही मॅचचं चित्र बदलू शकतं. ऑस्ट्रेलियन टीम अफगाणिस्तान विरुद्ध पराभूत झालीय. तरी त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय टीम करणार नाही. 2023 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानंच भारतीय टीमचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी टीम इंडियाला वर्षभराच्या आत चालून आलीय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world