Ifran Pathan vs Sanjay Manjrekar on Virat Kohli-Jaiswal Run Out Controversy: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस यजमान टीमची बाजू वरचढ आहे. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग 474 रनवर संपुष्टात आली. त्यानंतर भारतीय इनिंगची सुरुवात खराब झाली. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) 3 रन काढून आऊट झाला. केएल राहुलला (KL Rahul) देखील मोठी खेळी करण्यात अपयश आलं. राहुलला 24 रनवर पॅट कमिन्सनं आऊट केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रोहित आणि राहुल परतल्यानंतर यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी टीम इंडियाची इनिंग सावरली. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 102 रनची पार्टनरशिप झाली होती. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला चोख उत्तर देणार असं वाटत असतानाच मॅचचं चित्र बदललं. यशस्वी आणि विराट यांच्यात झालेल्या मोठ्या गैरसमजुतीमुळे यशस्वी जैस्वाल रन आऊट झाला.
यशस्वी जैस्वाल आऊट होण्यात कुणाची चूक आहे त्यावर वेगवेगळी मतं व्यक्त होत आहेत. या सीरिजचे ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सच्या पोस्ट डे कार्यक्रमात या विषयावर माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर आणि इरफान पठाण (Sanjay Manjrekar vs Irfan Pathan on Yashasvi Jaiswal Run Out) यांच्यात जोरदार वाद झाला.
संजय मांजरेकर आणि इरफान पठाण यांच्यात जोरदार वाद
मांजरेकर म्हणाला (Sanjay Manjrekar on Virat Kohli) : विराट कोहललीला यशस्वी जैस्वालच्या कॉलला उत्तर देऊन एक रन काढायला हवा होता. कारण तो धोकादायक नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं पळत होता.
इरफान पठाण असहमत (Irfan Pathan on Virat Kohli) : संजय मांजरेकर यांनी व्यक्त केलेल्या मतावर इरफान पठाणनं असहमती व्यक्त केली. विराट कोहली स्ट्रायकर एंडवर आऊट होण्याची शक्यता होती, असं इरफाननं सांगितलं. बॉल वेगानं फिल्डरच्या दिशेनं जात होता, असं इरफाननं सांगितलं.
( नक्की वाचा : IND vs AUS : विराट कोहलीला मोठा धक्का, ऑस्ट्रेलियन खेळाडूशी झालेल्या वादानंतर मिळाली शिक्षा )
संजय मांजरेकरनं सांगितलं : बॉल संथ गतीनं जात होता. कोहली रन आऊट झाला असता असं मला वाटत नाही. तो जैस्वालचा निर्णय होता. त्यामध्ये कदाचित जोखीम होती. पण, धोकादायक एन्डवर जैस्वाल होता. कोहली नाही. विराटची चूक होती. त्यानं मागं वळून पाहिलं आणि तिथं रन निघू शकत नाही, हा निर्णय घेतला. जैस्वालचा निर्णय चुकीचा असता तर तो नॉन-स्ट्रायकर एंडवर आऊट झाला असता.'
इरफाननं दिलं उत्तर : इराफान पठाणनं मांजरेकरच्या दाव्याचं खंडन केलं. तो म्हणाला, विराट कदाचित रन घेण्यास तयार नव्हता. कारण बॉल किती वेगानं तिथं फिल्डिंग करत असलेल्या पॅट कमिन्सकडं गेला हे त्यानं पाहिलं होतं. नॉन स्ट्रायकर म्हणून विराटला वाटलं की तिथं रन निघू शकत नाही किंवा जोखीम आहे, तर तो रन काढण्यास मनाई करु शकतो, असं माजी भारतीय ऑल राऊंडरनं स्पष्ट केलं.
Post match kalesh between Irfan Pathan and Sanjay Manjrekar 😂 @gharkekalesh pic.twitter.com/xlIEKPTqM0
— Stanley (@mchoudhary581) December 27, 2024
मांजरेकरचा पठाणवर पलटवार : इराफानचं हे उत्तर संजय मांजरेकरला आवडलं नाही. 'तुला मला बोलायचं नसेल तर काही हरकत नाही,' असं मांजरेकरनं सांगितलं. त्यानंतरही इराफाननं त्याचा मुद्दा सोडला नाही. ते पाहून मांजरेकर यांनी संयम गमावला. 'रन आहे की नाही याबाबत इराफान पठाणची व्याख्येचा कोचिंगच्या पुस्तकात समावेश केला पाहिजे, असं मांजरेकर उपहासानं म्हणाला.
( नक्की वाचा : Year Ender 2024 : T20 वर्ल्ड कप विजेतेपद ते अश्विनची रिटायरमेंट, कसं गेलं भारतीय क्रिकेटसाठी वर्ष? )
त्यानंतर चर्चेच्या दरम्यान मांजरेकरनं विराटच्या आऊट होण्याचा मुद्दाही उपस्थित केला. यशस्वी जैस्वाल आऊट होण्यामागील चूक विराटच्या लक्षात आली असावी. त्याच्या मनात ती सल असेल. तोपर्यंत तो ऑफ स्टंपच्या बाहेरील बॉल सोडत होता. पण यशस्वी रन आऊट झाला आणि विराटची एकाग्रता भंग झाली, असं मांजरेकरनं सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world