जाहिरात
Story ProgressBack
7 days ago
मुंबई:

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने वेस्ट इंडिज येथे सुरु असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. २७ तारखेला भारताचा उपांत्य फेरीचा सामना इंग्लंडविरुद्ध रंगणार आहे. त्याआधी सुपर ८ फेरीच्या अखेरच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाची कडवी झुंज २४ धावांनी मोडून काढत सलग तिसरा विजय संपादन केला. महत्वाची बाब म्हणजे भारत-इंग्लंड या सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे. त्यामुळे पावसाने व्यत्यय आणल्यास हा सामना रद्द झाला तर अ गटात अव्वल स्थान मिळवल्याच्या निकषावर भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताकडून कर्णधार रोहित शर्माने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. विराट कोहली स्वस्तात बाद झाल्यानंतरही त्याने आपल्या आक्रमक शैलीत कांगारुंची धुलाई केली. मैदानात चौफेर फटकेबाजी करताना रोहित शर्माने आपलं अर्धशतक पूर्ण करत शतकाच्या दिशेने वाटचाल केली. परंतु ८ धावा दूर असताना रोहित बाद झाला. रोहितने ४१ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकार लगावत ९२ धावा केल्या. यानंतर मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी मधल्या फळीत केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने निर्धारित षटकांत ५ विकेट गमावत २०५ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून स्टॉयनिस आणि स्टार्कने प्रत्येकी २-२ तर हेजलवूडने १ विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात खराब झाली. अर्शदीप सिंगने डेव्हीड वॉर्नरला स्वस्तात माघारी धाडलं. परंतु यानंतर भारतासाठी नेहमी डोकेदुखी ठरणारा ट्रॅविस हेडने भारतीय गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केलं. आधी मिचेल मार्श आणि त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलसोबत महत्वाच्या भागीदारी रचत हेडने ऑस्ट्रेलियाचं आव्हान सामन्यात कायम राखलं. परंतु मोक्याच्या क्षणी मार्श आणि मॅक्सवेल बाद झाले. परंतु अर्धशतक झळकावलेला ट्रॅविस हेड मैदानात असेपर्यंत भारताला धोका कायम होता. परंतु अखेरच्या षटकांत जसप्रीत बुमराहने हेडला बाद करत भारताला मोठा यश मिळवून दिलं. हेडने ४३ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकार लगावत ७६ धावा केला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ सामन्यात कमबॅक करुच शकला नाही आणि भारताचा विजय सुनिश्चित झाला.

Jun 24, 2024 23:45 (IST)
Link Copied

वन-़डे विश्वचषकाचा बदला पूर्ण, भारताची ऑस्ट्रेलियावर मात...उपांत्य फेरीत प्रवेश

अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याच्या फक्त ४ धावा....२४ धावांनी ऑस्ट्रेलियावर मात करत भारत उपांत्य फेरीत दाखल. २७ तारखेला भारतासमोर उपांत्य फेरीत इंग्लंडचं आव्हान

Jun 24, 2024 23:38 (IST)
Link Copied

ऑस्ट्रेलियाच्या डावाला घसरगुंडी, टीम डेव्हीड परतला माघारी

अर्शदीप सिंगच्या फुलटॉस बॉलवर फटका खेळण्याच्या नादात टीम टेव्हीड बाद, ऑस्ट्रेलियाचा सातवा फलंदाज परतला माघारी

Jun 24, 2024 23:30 (IST)
Link Copied

ऑस्ट्रेलियाचा रस्ता खडतर, मॅथ्यू वेड बाद होऊन परतला माघारी

अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर कुलदीप यादवने घेतला हेडचा सुरेख कॅच

Jun 24, 2024 23:26 (IST)
Link Copied

मोक्याच्या क्षणी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ट्रॅविस हेड माघारी परतला

भारतीय संघाचा संकटमोचक जसप्रीत बुमराह पुन्हा संघासाठी आला धावून. ट्रॅविस हेडला धाडलं माघारी. मोठा फटका खेळण्याच्या नादात हेड रोहित शर्माकडे कॅच देऊन परतला माघारी. ४३ बॉलमध्ये ९ चौकार आणि ४ षटकार लगावत हेडच्या ७६ धावा

Jun 24, 2024 23:22 (IST)
Link Copied

मिचेल मार्शची एकाकी झुंज, भारतीय गोलंदाजांना अद्याप मोठं काम करणं बाकी

सलामीवीर ट्रॅविस हेडची एक बाजू लावून धरत झुंज सुरुच...WTC Final, ODI World Cup Final आणि त्यानंतर T-20 World Cup मध्येही हेड भारताला ठरतोय डोकेदुखी. भारतीय गोलंदाजांची धुलाई करत ट्रॅविस हेडचं अर्धशतक

Jun 24, 2024 23:18 (IST)
Link Copied

खराब सुरुवात...मग फटकेबाजी आणि नंतर पुन्हा बॅकफूट...कांगारुंची झुंज सुरुच

डेव्हीड वॉर्नरला स्वस्तात बाद झाल्यानंतर मिचेल मार्श आणि ट्रॅविस हेडची दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी. या भागीदारीत भारतीय खेळाडूंकडून ऑस्ट्रेलियाला जीवदान. परंतु अखेरीस कुलदीप यादवने मार्शला बाद करत भारताला दुसरं यश मिळवून दिलं. यानंतर ग्लेन मॅक्सवेलचीही फटकेबाजी. परंतु त्यालाही आपल्या जाळ्यात अडकवण्यात कुलदीपला यश. मार्श ३७ तर मॅक्सवेल १९ धावा काढून बाद. स्टॉयनिसला स्वस्तात बाद करण्यात भारताला यश आणि कांगारु पुन्हा बॅकफूटवर

Jun 24, 2024 22:09 (IST)
Link Copied

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारुंची खराब सुरुवात, वॉर्नर माघारी परतला

डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंगने वॉर्नरला धाडलं माघारी, अवघ्या ६ धावांवर वॉर्नर बाद

Jun 24, 2024 21:53 (IST)
Link Copied

टीम इंडियाची २०० पार मजल, हार्दिक-जाडेजाची फटकेबाजी

शिवम दुबे माघारी परतल्यानंतर हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजाने अखेरच्या षटकात फटकेबाजी करत भारताला २०० धावांचा टप्पा पार करुन दिला. निर्धारित षटकांत ५ विकेट गमावत भारताची २०५ धावांपर्यंत मजल

Jun 24, 2024 21:52 (IST)
Link Copied

फटकेबाजी करणारा शिवम दुबेही परतला माघारी

स्टॉयनिसने घेतली विकेट, 28 धावा करुन दुबे बाद

Jun 24, 2024 21:28 (IST)
Link Copied

टीम इंडियाला चौथा धक्का

सूर्यकुमार यादवच्या रुपानं भारताची चौथी विकेट पडली.  तो 31 रन काढून आऊट झाला. सूर्याला मिचेल स्टार्कनं आऊट केलं. 

Jun 24, 2024 21:12 (IST)
Link Copied

रोहित शर्माची सेंंच्युरी हुकली

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला त्याची सेंच्युरी झळकावता आली नाही. मिचेल स्टार्कनं त्याला 92 रनवर आऊट केलं. रोहितनं फक्त 41 बॉलमध्ये 7 फोर आणि 8 सिक्ससह हे रन केले. 

Jun 24, 2024 20:57 (IST)
Link Copied

टीम इंडियाचे 100 रन्स पूर्ण

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब सुरुवातीनंतर भारतीय टीमनं कमबॅक केलंय. रोहित शर्माच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारतीय टीमनं 8.4 ओव्हर्समध्येच 100 रन पूर्ण केले आहेत. 

Jun 24, 2024 20:53 (IST)
Link Copied

टीम इंडियाला दुसरा धक्का

ऋषभ पंतला मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं. तो 15 रन काढून आऊट झाला. रोहित आणि ऋषभनं दुसऱ्या विकेटसाठी 87 रनची पार्टनरशिप केली. 

Jun 24, 2024 20:47 (IST)
Link Copied

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड

टीम इंडियाच्या कॅप्टननं हाफ सेंच्युरी पूर्ण केलीच. त्याचबरोबर टी20 इंटरनॅशनलमध्ये 200 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला आहे. हा टप्पा गाठणारा रोहित हा एकमेव क्रिकेटपटू आहे. आजवर कुणालाही ही कामगिरी करता आलेली नाही. 

Jun 24, 2024 20:40 (IST)
Link Copied

रोहितची दमदार हाफ सेंच्युरी

रोहित शर्माची फटकेबाजी पावसानंतरही सुरुच आहे. रोहितनं फक्त 19 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी पूर्ण केलीय. त्यानं 4 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीनं हाफ सेंच्युरी केली आहे. 

Jun 24, 2024 20:33 (IST)
Link Copied

पावसामुळे खेळ थांबला

रोहित शर्मा आक्रमक खेळ करत असतानाच पावसामुळे खेळ थांबवावा लागला आहे.  खेळ थांबला तेंव्हा टीम इंडियानं 4.1 ओव्हर्समध्ये 1 आऊट 43 रन केले आहेत. 

रोहित शर्मा फक्त 14 बॉलमध्ये 41 रन काढून नाबाद आहे. तर ऋषभ पंत 1 रन काढून त्याला साथ देतोय. 

Jun 24, 2024 20:30 (IST)
Link Copied

.... तर टीम इंडिया सेमी फायनलपूर्वीच होणार आऊट

टीम इंडियानं या टी20 वर्ल्ड कपमध्ये अद्याप एकही सामना गमावलेला नाही. पण, अजूनही टीम इंडियाचा सेमी फायनलमधील प्रवेश नक्की नाही. 

वाचा -.... तर टीम इंडिया सेमी फायनलपूर्वीच होणार आऊट!

Jun 24, 2024 20:20 (IST)
Link Copied

रोहित शर्माकडून स्टार्कची धुलाई

विराट कोहली आऊट झाल्यानंतरही रोहित शर्माचा धडका सुरुच आहे. रोहितनं मिचेल स्टार्कच्या एकाच ओव्हरमध्ये 3 सिक्स आणि 1 फोर लगावला.

Jun 24, 2024 20:13 (IST)
Link Copied

टीम इंडियाची खराब सुरुवात

टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. विराट कोहली शून्यावर आऊट झाला. विराटला जोश हेजलवूडनं आऊट केलं. 

Jun 24, 2024 19:47 (IST)
Link Copied

ऑस्ट्रेलियन टीममध्ये एक बदल

अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियासाठी ही मॅच 'करो वा मरो' आहे. या मॅचसाठी ऑस्ट्रेलियन टीममध्ये मिचेल स्टार्कचं पुनरागमन झालंय.

ऑस्ट्रेलियाची टीम : ट्रेव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉईनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेट किपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झम्पा, जोश हेजलवूड

Jun 24, 2024 19:44 (IST)
Link Copied

कशी आहे टीम इंडिया?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय टीममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

टीम इंडिया Playing 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेट किपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या (व्हाईस कॅप्टन), रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग

India Elections | Read Latest News on Lok Sabha Elections 2024 Live on NDTV.com. Get Election Schedule, information on candidates, in-depth ground reports and more - #ElectionsWithNDTV

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाने 'खेळ' केला तर... कसं असेल सेमीफायनलचं गणित?
T-20 World Cup : 24 धावांनी सामना जिंकत भारतीय संघ उपांत्य फेरीत, कांगारु स्पर्धेबाहेर जायच्या वाटेवर
T-20 WC Rohit Sharma shines vs Australia completes 200 sixes mark in T20 Cricket
Next Article
T-20 WC : कांगारुंच्या शेपटावर 'हिटमॅन'चा पाय, टी-20 क्रिकेटमध्ये केला अनोखा विक्रम
;