जाहिरात
Story ProgressBack

एका Video नं माझी वाट लावली! रोहित शर्मानं हात जोडून काय केली विनंती?

Rohit Sharma Viral Video : आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलंय. त्याचवेळी रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Read Time: 2 mins
एका Video नं माझी वाट लावली! रोहित शर्मानं हात जोडून काय केली विनंती?
Rohit Sharma : रोहित शर्मानं कॅमेरामनसमोर हात जोडले.
मुंबई:

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) शेवटचा क्रमांक पटकावलाय. पाच वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या टीमला यंदा फक्त 4 सामने जिंकता आले. लखनौ सुपर जायंट्सनं (LSG) शुक्रवारी झालेल्या सामन्यात मुंबईचा 18 रननं पराभव केला. या मॅचपूर्वीचा रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामध्ये तो हात जोडून विनंती करतोय.

काय आहे व्हिडिओ?

रोहित शर्मा त्याचा जुना सहकारी धवल कुलकर्णीशी बोलत होता. त्यावेळी एका कॅमेरामननं त्याचा व्हिडिओ शूट करत होता. रोहितला ते आवडलं नाही. त्यानं त्याच्या स्टाईलनं कॅमेरामनला सुनावलं. रोहितनं हात जोडले आणि कॅमेरामनला म्हणाला, 'भावा ऑडिओ बंद कर. एका व्हिडिओनं माझी वाट लावलीय.' सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय.

काही दिवसांपूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडिओ समोर आला होता. रोहित आणि केकेआरचा असिस्टंट कोच अभिषेक नायर यांच्यातील चर्चेचा हा व्हिडिओ होता. या व्हिडिओतील चर्चेनुसार रोहित शर्मा पुढच्या वर्षी मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही, असा अंदाज अनेकांनी लावला. रोहित आणि मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीमध्ये सर्व काही ठीक नसल्याची चर्चा त्या व्हिडिओमुळे सुरु झाली. 

( नक्की वाचा : RCB चं 'प्ले ऑफ' गाठण्याचं स्वप्न राहणार अपूर्ण! CSK विरुद्धच्या मॅचपूर्वी Video Viral )
 

रोहितची दमदार खेळी

रोहित शर्मानं शुक्रवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 38 बॉलमध्ये 68 रनची दमदार खेळी केली. यामध्ये त्यानं 10 फोर आणि 3 सिक्स लगावले. त्याच्या खेळीनंतरही मुंबई इंडियन्सला विजय मिळवता आलं नाही. लखनौनं दिलेल्या 215 रनचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 196 रनच करता आले. मुंबई इंडियन्सचा पराभव झाला असला तरी T20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाच्या कॅप्टनला गवसलेला फॉर्म हा भारतीय फॅन्सना दिलासा देणारा आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
RCB की CSK, मुकाबल्यात कोण जिंकणार? लाराने स्पष्टपणे सांगितले
एका Video नं माझी वाट लावली! रोहित शर्मानं हात जोडून काय केली विनंती?
IPL 2024 rohit-sharma-ishan-kishan-hardik-pandya-jasprit-bumrah-tim-david-know-how-mumbai-indians-most-expensive-player-perform
Next Article
मुंबई इंडियन्सचा फ्लॉप शो, वाचा कोट्यवधी रुपये घेणाऱ्या खेळाडूचा एक रन-विकेट किती पडली महाग
;