जाहिरात

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगची AB डीव्हिलियर्सला वाटते काळजी, कारणही सांगितलं

AB de Villiers react on Vaibhav Suryavanshi:मिस्टर 360 म्हणून प्रसिद्ध असलेल्या एबी डीव्हिलियर्सनं वैभवची बॅटिंग पाहून प्रतिक्रिया दिली आहे.

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगची AB डीव्हिलियर्सला वाटते काळजी, कारणही सांगितलं
मुंबई:

AB de Villiers react on Vaibhav Suryavanshi: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशीची (Vaibhav Suryavanshi) सध्या संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चा आहे. 14 वर्षांच्या वैभवनं आयपीएल इतिहासात दुसऱ्या क्रमांकाची वेगवान सेंच्युरी झळकावली आहे. वैभवनं गुजरात टायटन्सविरुद्ध फक्त 35 बॉलमध्ये सेंच्युरी करत सर्वांनाच धक्का दिला. या खेळीमुळे वैभवचं संपूर्ण क्रिकेट विश्वातून कौतुक होत आहे. मिस्टर 360 म्हणून प्रसिद्ध असलेल्या एबी डीव्हिलियर्सनं वैभवची बॅटिंग पाहून प्रतिक्रिया दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

एबी डीव्हिलियर्सनं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितलं की, '14 व्या वर्षी ही कमाल, मी त्याच्याबद्दल काय सांगू... प्रामाणिकपणे सांगायचं तर माझ्याकडं कोणतेही शब्द नाहीत. गुजरात विरुद्धच्या मॅचमधली मी त्याची बॅटिंग पाहिली. त्याची बॅटिंग तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारी होती. माझा मुलगा 10 वर्षांचा आहे. तो 14 व्या वर्षी सीनिअर लेव्हलला असं खेळू शकेल असं मला वाटत नाहीत. 

काळजीची गोष्ट कोणती?

एबी पुढे म्हणाला की, 'त्याची बॅटिंग अतिशय आक्रमक आहे. तो पुढं येऊन खेळतो. वेगवान बॅटिंग करतो. मी या प्रकारची सेंच्युरी यापूर्वी कधी पाहिली नाही. ही विचार करण्याची गोष्ट आहे. त्याची आक्रमक शैली माझ्यासाठी काळजीचा विषय आहे. त्यामुळे अनियमितता (inconsistency) येऊ शकते. तो प्रत्येक मॅचमध्ये रन करु शकेल की नाही हे पाहावं लागेल. तो सध्या 14 वर्षांचा आहे. त्याच्याकडं अजून बराच वेळ आहे. 14 वर्षांच्या मुलाकडून तुम्ही आणखी काय अपेक्षा करु शकता?'

( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : 'पापा प्रणाम...' विक्रमी खेळीनंतर वैभवनं सर्वात पहिल्यांदा केला वडिलांना फोन, पाहा इमोशनल Video )
 

द्रविडसोबत आहे....

एबी त्याचा मुद्दा सांगताना पुढे म्हणाला की, 'त्याच्यासोबत राहुल द्रविड आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्याला द्रविडनं कोणताही दबाव न घेता बॅटींग करायला सांगितलं असावं असा माझा अंदाज आहे. त्याच्याकडं चांगलं तंत्र आहे. तो मोठे फचके मारु शकतो. त्याचे हवाई फटके मैदानाच्या बाहेर जातात. त्याच्याकडं पाहिल्यावर वाटतं तो वर्ल्ड क्रिकेटचं भविष्य आहे.'

Vaibhav Suryavanshi : लक्ष्मणनं पुसले डोळे...द्रविडनं दिले धडे, 2 महान खेळाडूंनी कसा घडवला छोटा चॅम्पियन?

( नक्की वाचा :  Vaibhav Suryavanshi : लक्ष्मणनं पुसले डोळे...द्रविडनं दिले धडे, 2 महान खेळाडूंनी कसा घडवला छोटा चॅम्पियन? )

एबी डीव्हिलियर्सनं पुढं सांगितलं की, 'परिस्थितीनुसार बॅटिंगचा गियर बदलणारे खेळाडू मला आवडतात. वैभव पहिल्या सहा ओव्हरमध्ये खूप आक्रमक बॅटिंग करतो. तो त्यानंतर कसा खेळेल हे पाहावं लागेल. पण, मला आशा आहे वैभव खूप पुढं जाईल. तो आणखी तरुण आहे. त्याच्या कारकिर्दीमध्ये चढ-उतार यायचे आहेत. काही क्षेत्रात तो अपरिपक्व आहे. पण, त्याच्यात सुधारणा करतील असे अनेक जण त्याला भेटतील.'
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: