जाहिरात

LSG Vs DC: पहिल्याच सामनात 27 कोटी पाण्यात! पठ्ठ्या शून्यावर आऊट अन् मिम्सचा महापूर

Rishabh Pant Scores Duck Scores Memes: लखनऊच्या संघाने 27 कोटी रुपये देऊन पंतला आपल्या संघात घेतले होते. त्यामुळे तो धडाकेबाज खेळ करेल अशी अपेक्षा होती, मात्र पंतने सर्वांनाच निराश केले. 

LSG Vs DC: पहिल्याच सामनात 27 कोटी पाण्यात! पठ्ठ्या शून्यावर आऊट अन् मिम्सचा महापूर

IPL 2025 LSG Vs DC: क्रिडाविश्वात सध्या आयपीएलचा रणसंग्राम सुरु आहे. यंदाच्या आयपीएल लिलावात लखनऊ सुपर जायंट्स संघाने भारताचा स्टार फलंदाज ऋषभ पंतला तब्बल 27 कोटींना विकत घेतले होते. त्यामुळे यंदाच्या आयपीएल मधला ऋषभ पंत हा महागडा खेळाडू ठरला होता. आता 27 कोटीला घेतलेल्या ऋषभ पंतकडून चाहत्यांच्याही जोरदार अपेक्षा होत्या, मात्र पहिल्याच सामन्यात पंतने निराशा केली ज्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा महापूर आल्याचे पाहायला मिळाले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आयपीएलमध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनऊच्या संघाने दिल्लीसमोर 210 धावांचे टार्गेट दिले. लखनऊच्या संघाने 27 कोटी रुपये देऊन पंतला आपल्या संघात घेतले होते. त्यामुळे तो धडाकेबाज खेळ करेल अशी अपेक्षा होती, मात्र पंतने सर्वांनाच निराश केले. 

ऑस्ट्रेलियाचा मिशेल मार्श शानदार फलंदाजी करत बाद झाल्यानंतर एलएसजीचा कर्णधार पंत क्रीजवर आला. यावेळी त्याच्या संघाची धावसंख्या 2 बाद 133 धावा होती. संघ 10 पेक्षा जास्त धावा करत होता. पंत हाच रनरेट तो कायम ठेवेल अशी सर्वांना अपेक्षा होती. पण हे घडले नाही. पंत येताच त्याने मुकेश कुमारच्या षटकातील दोन डॉट बॉल खेळले.

DC Vs LSG: 6,6,6,6... मिचेल मार्शची स्फोटक खेळी, लखनऊचे दिल्लीसमोर 'इतक्या' धावांचे टार्गेट

13 व्या षटकात निकोलस पूरनने स्टब्सच्या चेंडूवर 4 षटकार आणि 1 चौकार लगावला. या षटकात त्याने 28 धावा केल्या. फिरकी गोलंदाज कुलदीप यादव 14 वे षटक टाकण्यासाठी आला. पंतने त्याचे पहिले तीन चेंडू बिनधाव  टाकले. चौथ्या चेंडूवर पंत लाँग ऑफवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. पंतने 6 चेंडू काढून शून्यावर बाद झाला. पंत शून्यावर आऊट झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा महापूर पाहायला मिळत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: