जाहिरात

IPL 2025 Mega Auction : कधी आणि कुठे पाहता येणार खेळाडूंचा महालिलाव, वाचा सर्व प्रश्नांची उत्तर

IPL 2025 Mega Auction LIVE Updates : आयपीएल 2025 साठी खेळाडूंचं मेगा ऑक्शन आज आणि उद्या (रविवार आणि सोमवार) होणार आहे.

IPL 2025 Mega Auction : कधी आणि कुठे पाहता येणार खेळाडूंचा महालिलाव, वाचा सर्व प्रश्नांची उत्तर
मुंबई:

IPL 2025 Mega Auction Live Update : आयपीएल 2025 साठी खेळाडूंचं मेगा ऑक्शन आज आणि उद्या (रविवार आणि सोमवार) होणार आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या लीगमधील मेगा ऑक्शनसाठी जगभरातील 577 खेळाडूंची नावं शॉर्टलिस्ट झाले आहेत. यामध्ये 367 भारतीय आणि 210 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यंदा आयपीएल इतिहासातील सर्वाधिक महाग खेळाडू खरेदी होण्याचा रेकॉर्ड होईल असं मानलं जातंय. त्यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष या ऑक्शनकडं लागलंय. हे ऑक्शन कधी आणि कुठे पाहता येईल, कोणते प्रमुख खेळाडूंवर यंदा बोली लागणार आहे, हे सर्व आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

किती जागांसाठी होणार निवड?

दहा टीममधील एकूण 204 जागांसाठी या ऑक्शनमध्ये बोली लागणार आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त 70 जागांवर विदेशी खेळाडूंना खरेदी करता येईल. वेगवेगळ्या बेस प्राईजमध्ये या खेळाडूंसाठी बोली लागणार आहे. 2 कोटी रुपये सर्वाधिक बेस प्राईज असून सर्वात कमी बेस प्राईज 30 लाख रुपये आहे. 

कधी होणार सुरुवात?

रविवार आणि सोमवार (24 आणि 25 नोव्हेंबर) रोजी दोन टप्प्यांमध्ये हे ऑक्शन होणार आहे. त्यामध्ये 45 मिनिटांच्या ब्रेकचा समावेश आहे. पहिलं सत्र दुपारी 3.30 ते संध्याकाळी 5.00 पर्यंत असेल. 5.00 ते 5.45 लंच ब्रेकचा कालावधी आहे. तर दुसरं सेशन 5.45 ते रात्री 10.30 दरम्यान होईल.

IPL 2025 : शाहरुखचा 'बाजीगर' कुणाचा होणार 'डॉन'?, आयपीएल विजेत्या कॅप्टनसाठी 3 टीममध्ये चुरस

( नक्की वाचा : IPL 2025 : शाहरुखचा 'बाजीगर' कुणाचा होणार 'डॉन'?, आयपीएल विजेत्या कॅप्टनसाठी 3 टीममध्ये चुरस )

कोणत्या खेळाडूंवर सर्वाधिक लक्ष?

आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये 577 खेळाडू असले तरी दोन मर्क्युरी गटातील 12 खेळाडूंवर सर्वांचं लक्ष असेल. या गटातील खेळाडूंवरच सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता आहे. मर्क्युरी गटातील 10 खेळाडू खालील प्रमाणे आहेत.

लिस्ट 1
ऋषभ पंत
श्रेयस अय्यर
जोस बटलर
अर्शदीप सिंग
कागिसो रबाडा
मिचेल स्टार्क

लिस्ट 2
केएल राहुल
युजवेंद्र चहल
लियाम लिव्हिंगस्टोन
डेव्हिड मिलर
मोहम्मद शमी
मोहम्मद सिराज

यामधील डेव्हिड मिलर सोडून सर्व खेळाडूंचे ब्रेस प्राईज 2 कोटी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमक बॅटरनं स्वत:ची बेस प्राईज दीड कोटी ठेवली आहे. 

कधी आणि कुठे पाहता येणार लिलाव?

इंडियन प्रीमियर लीग 2025 चं मेगा ऑक्शन तुम्हाला स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. तर लाईव्ह स्ट्रिमिंग जियो अ‍ॅपवर मोफत पाहता येईल. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com