
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ पदकाच्या आणखी एक पाऊल जवळ गेला आहे. भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत आज पेनल्टी शूटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनवर मात केली आणि उपांत्य फेरी गाठली आहे. निर्धारित वेळेतला सामना 1-1 ने बरोबरीत सुटल्यामुळे निकाल पेनल्टी शूटआऊटवर गेला. शूटआऊटमध्ये भारताची ग्रेट ब्रिटनवर 4-2 ने मात केली.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
#ParisOlympics2024 | India beat Great Britain in Men's Hockey quarterfinal; enters semi-final pic.twitter.com/b07wyCEbdi
— ANI (@ANI) August 4, 2024
सामन्यात भारतीय संघाचा अनुभवी गोलकीपर पी.आर. श्रीजेशने आपल्या उत्तम बचावाचं प्रदर्शन घडवलं. ग्रेट ब्रिटनच्या संघाने निर्धारित वेळेत केलेली 21 आक्रमणं श्रीजेशने परतावून लावली. याव्यतिरिक्त पेनल्टी शूटआऊटमध्येही श्रीजेशने ग्रेट ब्रिटनचा तिसरा आणि चौथा प्रयत्न हाणून पाडला. याचदरम्यान भारताच्या आघाडीच्या फळीने मिळालेल्या संधीचं सोनं करत शूटआऊटमध्ये चार संधीत चार गोल करत भारताच्या 4-2 या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
(नक्की वाचा- Paris Olympics 2024 : पॅरिसमध्ये भारत इतिहास रचणार, आणखी 7 मेडल मिळणार! पाहा कोण आहेत दावेदार?)
सामन्यातील पंचांचा निर्णय वादात
भारतीय संघासाठी हा सामना थोडासा वादग्रस्त ठरला. भारताच्या अमित रोहिदासला रफ हँडलिंगसाठी रेड कार्ड देऊन मैदानाबाहेर करण्यात आलं. अमितची हॉकी स्टिक ही खेळादरम्यान ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूच्या नाकाला लागली. तिसऱ्या पंचांनी त्याची ही कृती मुद्दाम असल्याचं ठरवत त्याला रेड कार्ड द्यायाला लावलं. यानंतर भारताचा सुमीत हा खेळाडूही ग्रीन कार्ड मिळाल्यामुळे पाच मिनिटे मैदानाबाहेर होता. त्यामुळे निर्धारित वेळेतल्या सामन्यात भारत 9-10 खेळाडूंसह खेळत होता.
( नक्की वाचा : मनू भाकरसोबत भारताला ब्रॉन्झ मेडल जिंकून देणारा सरबजोत सिंग कोण आहे? )
पेनल्टी शूटआऊटमध्ये असा रंगला सामना
- ग्रेट ब्रिटन - 1,1,0,0
- भारत - 1,1,1,1
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world