जाहिरात
Story ProgressBack

मुंबईला घाम काढणारा खेळाडू ठरणार गुजरातचं ट्रम्प कार्ड

गेली दोन सिझन आयपीएल फायनल गाठणारी गुजरात टायटन्सची टीम यंदा नव्या 'ट्रम्प कार्ड'सह मैदानात उतरु शकते.

Read Time: 2 min
मुंबईला घाम काढणारा खेळाडू ठरणार गुजरातचं ट्रम्प कार्ड
गुजरात टायटन्सचा हा खेळाडू ठरणार ट्रम्प कार्ड (फोटो @BCCI)
मुंबई:

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेची सेमी फायनल मुंबई विरुद्ध तामिळनाडू यांच्यात झाली. मुंबईत झालेल्या या मॅचमध्ये तामिळनाडूची पहिली इनिंग 146 रन्सवरच संपुष्टात आली.  मुंबईचा या मॅचमध्ये पराभव झाला असला तरी एका खेळाडूनं त्यांना चांगलंच सतावलं होतं.

मुंबईच्या बलाढ्य बॅटिंग ऑर्डरला पहिल्या इनिंगमध्ये 146 रन्स पार करतानाही घाम निघाला होता. त्यांची अवस्था 6 आऊट 106 अशी झाली होती. त्या इनिंगमध्ये सहा विकेट्स घेत मुंबईचा घरच्या मैदानात घाम काढणारा बॉलर यंदा गुजरातचा ट्रम्प कार्ड ठरु शकतो.

गुजरातचा गौरवशाली इतिहास
 

गुजरात टायटन्सनं आत्तापर्यंत आयपीएलचे दोन सिझन खेळले आहेत. त्यामध्ये पहिल्याच सिझनमध्ये (2022) त्यांनी थेट विजेतेपद पटकावले. तर दुसऱ्या सिझनमध्ये (2023)  फायनलपर्यंत धडक मारली होती.


पहिल्या दोन्ही सिझनमध्ये फायनलपर्यंत पोहोचणारी गुजरात टायटन्स ही चेन्नई सुपर किंग्सनंतरची दुसरी टीम आहे.

कोण ठरेल 'ट्रम्प कार्ड'?

गुजरातसाठी या सिझनची सुरुवात चांगली झालेली नाही. त्यांचा आत्तापर्यंतचा कॅप्टन हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला. सर्वोत्तम फास्ट बॉलर मोहम्मद शमी दुखापतीमुळे हा सिझन खेळणार नाही.

इतकचं नाही तर लेग स्पिनर राशिद खानही मोठ्या दुखापतीनंतर टीममध्ये कमबॅक करतोय. त्यामुळे त्याच्या फिटनेसबद्दलही साशंकता आहे.
तीन बाजूंनी अडचणीत सापडलेल्या आशिष नेहराच्या गुजरातची या सिझनमधील आशा मुंबईचा रणजी स्पर्धेत घाम काढणारा साई किशोर ठरु शकतो. साई किशोर गुजरातची ट्रम्प कार्ड ठरण्याची तीन कारणं आहेत.

जबरदस्त फॉर्म
 

साई किशोरनं यंदाच्या रणजी सिझनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर यापूर्वी झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही तो सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर होता.


आयपीएल ही वेगळी स्पर्धा असली तरी देशांतर्गत क्रिकेटमधील फॉर्म त्याला या स्पर्धेत खेळताना उपयोगी ठरणार आहे.

प्रमुख स्पिनर

राशिद खान दुखापतीमधून परततोय. राहुल तेवातिया फारशी बॉलिंग करत नाही. त्यानं मागील दोन आयपीएल सिझनमध्ये एकही विकेट घेतलेली नाही. जयंत यादव गेल्या तीन वर्षात फक्त 6 आयपीएल मॅच खेळला आहे.

साई किशोर आणि नूर अहमद ही जोडी या परिस्थितीमध्ये गुजराचा स्पिन अटॅक सांभाळू शकते. आपण मोठ्या मॅचमध्येही उत्तम बॉलिंग करु शकतो हे साई किशोरनं यापूर्वी आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये दाखवलं होतं.

उपयुक्त फलंदाज

साई किशोर हा लोअर ऑर्डरमध्ये उपयुक्त बॅटींगही करु शकतो. त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 3 तर लिस्ट A क्रिकेटमध्ये 2 अर्धशतक झळकावली आहेत. निर्णायक क्षणी त्याची बॅटिंग देखील टीमला मदत करु शकते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination