जाहिरात
Story ProgressBack

T20 वर्ल्ड कप नंतर टीम इंडियाला मिळणार नवा कोच? जय शहानं दिलं महत्त्वाचं अपडेट

Jay Shah on Rahul Dravid : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ आणखी वाढणार नाही, हे जय शाह यांनी स्पष्ट केलंय.

Read Time: 2 mins
T20 वर्ल्ड कप नंतर टीम इंडियाला मिळणार नवा कोच? जय शहानं दिलं महत्त्वाचं अपडेट
Jay Shah : टीम इंडियाला नवा कोच मिळणार असल्याचे संकेत जय शाह यांनी दिले आहेत.
मुंबई:

BCCI secretary Jay Shah on Rahul Dravid: भारतीय क्रिकेट टीम आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे. द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ वन-डे वर्ल्ड कप 2023 नंतर समाप्त झाला होता. पण, टी20 वर्ल्ड कपचा विचार करुन हा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय बोर्ड आणि द्रविड यांनी परस्पर संमतीनं घेतला होता. आता द्रविडचा कार्यकाळ आणखी वाढणार नाही, असे संकेत बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिले आहेत. बीसीसीआय लवकरच कोच पदासाठी जाहिरात देणार असल्याचं जय शहानं स्पष्ट केलंय. 'क्रिकबझ' नं हे वृत्त दिलंय.  द्रविड 2021 पासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याचा करार जून महिन्यात समाप्त होणार आहे.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'क्रिकबझ' नं जय शहा यांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार 'राहुल द्रविडचा कार्यकाळ जूनपर्यंतच आहे. त्याला पून्हा अर्ज करायचा असेल तर तो करु शकतो. बॅटिंग कोच, बॉलिंग कोच, फिल्डिंग कोच तसंच अन्य कोचिंग स्टाफची नियुक्ती मुख्य प्रशिक्षकाशी चर्चा करुन केली जाईल, असं जय शाह यांनी सांगितलं. विदेशी कोचच्या शक्यतेचाही त्यांनी इन्कार केलेला नाही.  

( नक्की वाचा : रोहित, बुमराह, सूर्यानं केली हार्दिक पांड्याची तक्रार? टीम बाहेर पडताच नाराजी उघड )
 

'नवा कोच भारतीय असेल की विदेशी हे आम्ही निश्चित करु शकत नाही. ते सीएसीवर अवलंबून असेल. त्याचबरोबर वेगवेगळ्या फॉर्मेटसाठी वेगळे कोच नियुक्त करण्याची शक्यता नसल्याचं शाह यांनी संपष्ट केलं. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) तसंच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांनी हे मॉडेल स्विकारलं आहे.'

जय शाह यांनी सांगितलं की, ' हा निर्णय देखील सीएसीकडून घेतला जाईल. विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंतसह काही जण सर्व फॉर्मेटमधील खेळाडू आहेत. त्याचबरोबर भारतामध्ये अशा प्रकारचं कोणतंही उदाहरण नाही.' नव्या कोचची नियुक्ती दीर्घकाळासाठी असेल. त्याचा सुरुवातीचा कालावधी 3 वर्षांचा असेल, असं शाह यांनी स्पष्ट केलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
रोहित, बुमराह, सूर्यानं केली हार्दिक पांड्याची तक्रार? टीम बाहेर पडताच नाराजी उघड
T20 वर्ल्ड कप नंतर टीम इंडियाला मिळणार नवा कोच? जय शहानं दिलं महत्त्वाचं अपडेट
HPCA sets Artificial hybrid pitch in Dharamshala Ground  first time in India
Next Article
आता पावसामुळे क्रिकेटचा सामना रद्द होणार नाही, BCCI करतंय खेळपट्टीत नवा प्रयोग
;