भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या टी20 वर्ल्ड कप फायनलच्या ( T20 World Cup 2024 final) आठवणी आजही सर्वांच्या मनात ताज्या आहेत. सूर्यकुमार यादवचा अविस्मरणीय कॅच, जसप्रीत बुमराहचा खतरनाक स्पेल, विराट कोहलीची तडाखेबंद हाफ सेंच्युरी यासह अनेक गोष्टींमुळे टीम इंडियानं फायनलमध्ये विजय मिळवला. तब्बल 11 वर्षांनी भारतीय क्रिकेट टीमला आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. कॅप्टन रोहित शर्मानं या विजेतेपदामधील आणखी एक फॅक्टर सांगितला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निर्णायक क्षणी पंतनं चालवलं डोकं
रोहितनं कपिल शर्माच्या कॅमेडी शोमध्ये बोलताना ऋषभ पंतनं निर्णायक क्षणी डोकं चालवलं आणि त्याचा टीम इंडियाला कसा फायदा झाला हे सांगितलं. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या फायनलमधील शेवटच्या पाच ओव्हर्स बाकी असताना दक्षिण आफ्रिकेनं वर्चस्व होतं. आफ्रिकेला 30 बॉलमध्ये फक्त 30 रनची आवश्यता होती. डेव्हिड मिलर आणि हेन्रिक क्लासेन ही अनुभवी जोडी मैदानात होती. त्यावेळी पंतनं खेळाची स्पीड कमी केली, त्याचा टीम इंडियाला फायदा झाला असं रोहितनं स्पष्ट केलं.
दक्षिण आफ्रिकेला 30 बॉलमध्ये 30 रन हवे होते. त्यावेळी ब्रेक झाला. तो ब्रेक लवकर संपून खेळ सुरु व्हावा अशी बॅटर्सची इच्छा होती. त्याचवेळी ऋषभ पंतनं त्याच्या गुडघ्याला टेपिंग करुन घेतलं. त्यामुळे खेळाची गती कमी झाली. मी फिल्ड सेट करत होतो. बॉलर्सची बोलत होतो, त्यावेळी मी पाहिलं की पंत मैदानात पडला आहे त्याला फिजिओ टेपिंग करत आहे. क्लासेन खेळ सुरु होण्याची वाट पाहात होता. हे विजयाचं एकमेव कारण आहे, असं मी म्हणत नाही. पण, हे एक नक्की कारण आहे, असं रोहितनं यावेळी सांगितलं.
Captain Rohit Sharma revealed the untold story of Rishabh Pant when India needed to defend 30 runs in 30 balls. Two Brothers ! 🥺❤️
— 𝐇𝐲𝐝𝐫𝐨𝐠𝐞𝐧 (@IamHydro45_) October 5, 2024
pic.twitter.com/EmqIrrCFb3
ड्रिंक ब्रेकनंतर खेळ सुरु झाला त्यावेळी हार्दिक पांड्यानं धोकादायक हेन्रीक क्लासेनला आऊट केलं. क्लासेन आऊट झाल्यानंतर टीम इंडियानं मॅचमध्ये कमबॅक केलं. धोकादायक मिलर मैदानात असेपर्यंत दक्षिण आफ्रिकेला मॅच जिंकू शकत होती. पण, दक्षिण आफ्रिका टीम शेवटच्या ओव्हर्समधील दबाव सहन करु शकली नाही.
( नक्की वाचा : Hardik Pandya : व्हिलन ते हिरो! सारं काही विरोधात असताना हार्दिकनं कसा जिंकून दिला भारताला वर्ल्ड कप? )
'हार्दिकनं क्लासेनला त्या ओव्हरमध्ये आऊट केलं. त्यानंतर आफ्रिकेवर दबाव वाढत गेला. त्यानंतर सर्व खेळाडूंनी एकत्र येऊन स्लेजिंग करत आफ्रिकेच्या बॅटर्सवर दबाव वाढवला. मी त्याबाबत अधिक काही सांगू शकत नाही. पण ते त्यावेळी आवश्यक होतं. त्यामुळे मी खेळाडूंना तुम्हाला दबाव वाढवण्यासाठी काही गोष्टी करायच्या आहेत तर करा, अंपायर आणि रेफ्रींचा विचार आपण नंतर करु असं सांगितलं होतं, असं रोहितनं यावेळी म्हणाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world