Jalgaon | धरणगावात शॉर्टसर्किटमुळे तीन एकरवरील मका जळून खाक,पिंपळे शिवारातल्या 2 शेतकऱ्यांचं नुकसान

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या पिंपळे शिवारात तीन एकर मक्याला आग लागली होती.विजेच्या तारांमुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडलीय. या घटनेत दोन शेतकऱ्यांचा लाख रुपयांचा मका जळून खाक झाला आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली.तसेच ग्राम महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला.दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ