हिंगोलीतील दोन पर्यटक श्रीनगरमध्ये अडकल्याची माहिती समोर आलीय.शास्त्रीनगर भागातील शुभम अग्रवाल आणि रचना अग्रवाल हे तीन दिवसांपूर्वी कश्मीर येथे ट्रीप साठी गेले होते.दरम्यान पहेलगाम येथे गोळीबार झाल्याची घटना कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी शुभम अग्रवाल संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.. मात्र शुभम अग्रवाल यांचा फोन लागत नसल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब चिंतेत सापडलं होतं मात्र काल रात्री उशिरा शुभम अग्रवाल चा फोन आल्यानंतर त्यांनी सुखरूप असल्याचे सांगितले.दरम्यान यासंदर्भात शूभम अग्रवाल यांच्या आईशी आमच्या प्रतिनिधीने बातचीत केलीय पाहुयात...