होणाऱ्या बायकोसाठी कट? PMO बनावट ओळखपत्र प्रकरणी मोठी अपडेट | Mumbai News
A plot for his future wife? Major update in the PMO fake ID case.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी बीकेसी येथील जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये झालेल्या घुसखोरी प्रयत्नाच्या प्रकरणात, आरोपी रोहन पारिखचा आपल्या होणाऱ्या बायको आणि सासरच्या मंडळींना प्रभावित करण्याचा आणि आपला प्रभाव दाखवण्याचा हेतू असल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहनचा नुकताच साखरपुडा झाला होता आणि लवकरच त्याचे लग्न होणार होते. चोरी करण्यापूर्वी आरोपी रोहनने पाहणी करण्यासाठी दोनदा एकट्याने जिओ वर्ल्ड प्लाझाला भेट दिली होती.
पोलिसांच्या तपासानुसार, रोहनच्या मोबाईल फोनमध्ये सापडलेले पीएमओ (पंतप्रधान कार्यालय) चे डिजिटल ओळखपत्र बनावट होते. रोहनने ते २०२५ मध्ये एआय (AI) वापरून स्वतः तयार केले होते.