मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या मनगटावरील घड्याळामुळे त्यांच्या एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.ही घड्याळ तब्बल एक कोटींपेक्षा जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही घड्याळा रोलेक्स कंपनीची आहे. या घड्याळाचं नाव यलो गोल्ड रोलेक्स डेटोना लाइट डायल आहे.तर भारतीय बाजारपेठेमध्ये या घड्याळाची किंमत एक कोटींच्या घरात आहे. महापौर रितू तावडे यांच्या मनगटावर असलेली घड्याळासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहोत.दरम्यान यावर रितू तावडे यांनी सोशल मीडियावरील आरोप फेटाळले आहेत.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या घड्याळाची माहिती ही खोटी आणि दिशाभूल करणारी आहे,असं महापौर रितू तावडे यांनी सांगितलं आहे.