स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करा,Sudhir Munangtiwar यांची शिफारस

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर "भारतरत्न" प्रदान करण्याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा,शी शिफारस सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केलीय.तर भाजप नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत सावकरांना भारतरत्न देण्याबाबत मागणी केली आहे. स्वातंत्रवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा. संसदीय कार्यमंत्री यांनी असा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठवावा, असे प्रसाद लाड यांनी म्हटले. त्यावर, संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. आम्ही हा ठराव सभापती महोदयांकडे मांडू आणि त्यांनतर आपण निर्णय घ्यावा, असे पाटील यांनी म्हटले.

संबंधित व्हिडीओ