नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील इयत्ता आठवीत शिकणारी १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी जी सध्या २६ आठवड्यांची गर्भवती आहे तिने वैद्यकीय गर्भपातासाठी उच्च न्यायालयाची परवानगी मागितली आहे.तिच्यावर तिच्याच अल्पवयीन सख्ख्या भावाकडून वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी तिच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.