Bhandara | लाखनी बाजार समितीत धानाची नासाडी, साठवणुकीबाबत निष्काळजीपणा झाल्याचा आरोप | NDTV
Allegations of paddy wastage and negligence regarding storage at the Bhandara Lakhni Market Committee.
राज्यात दुष्काळाचे सावट असताना भंडारा जिल्ह्यातील लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाच्या साठवणुकीबाबत गंभीर निष्काळजीपणाचा आरोप होत आहे. बाजार समितीच्या गोदामात साठवून ठेवलेले हजारो क्विंटल धान पावसाच्या पाण्यामुळे भिजून अंकुरले असून, काही ठिकाणी धान कुजल्याचेही चित्र समोर आले आहे. गोदामातील पोती फाटल्याने त्यात पाणी शिरल्याचा आरोप असून, परिसरात जनावरांचा मुक्त संचारही सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धानाची नासाडी झाल्याचा आरोप होत असून, या नुकसानीची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित केला जात आहे.