Latur Water Scarcity | भर पावसाळ्यात ग्रामीण भागात पाणीटंचाई, पाण्यासाठी महिलांच्या तासनतास रांगा

Latur Water Scarcity | भर पावसाळ्यात ग्रामीण भागात पाणीटंचाई, पाण्यासाठी महिलांच्या तासनतास रांगा Water scarcity in rural areas even at the peak of the monsoon; women queue for hours for water. लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पाण्याचे स्रोत आटत असल्याने भर पावसाळ्यातही गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव बोरी गावातही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मोठी धावपळ सुरू आहे. महिलांना पाण्यासाठी तासनतास रांगेत उभं राहण्याची वेळ आली असून, उपलब्ध पाण्यावरच गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे गावात तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ