Palghar | दुष्काळग्रस्तांच्या यादीत पालघरचा समावेश करा, शेतकरी नेते विश्वनाथ पाटील यांची मागणी
Include Palghar in the list of drought-affected areas: Farmer leader Vishwanath Patil's demand.
पालघर जिल्ह्यात पावसाच्या मोठ्या खंडामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत पालघर जिल्ह्याला स्थान न मिळाल्याने शेतकरी नेते विश्वनाथ पाटील यांनी नाराजी व्यक्त करत, सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे.