नीटप्रकरणी सीबीआयकडून आता नांदेडमध्येही धाड सत्र सुरु झालं आहे.. नांदेड शहरातील कोनाळे कोचिंग क्लासेसची सीबीआय पथकाकडून झाडाझडती करण्यात आली आहे.. विद्युत नगर आणि जलतरणिका मार्गावरील क्लासेसची सीबीआयकडून झाडाझडती करण्यात आली.. यादरम्यान, कुणालाही अटक करण्यात आलेली नसून हे धाडसत्र राबवल्यानंतर सीबीआयचं पथक लातूरच्या दिशेने गेल्याचीही माहिती आहे...