मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची वास्तू मंगळवारी लाल रंगाच्या विद्युत रोषणाईनं सजवण्यात आली.जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त ही रोषणाई कऱण्यात आली.दरवर्षी २८ मे रोजी 'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. मासिक पाळीच्या दरम्यान महिला आणि मुलींमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि या विषयाभोवती असलेले गैरसमज आणि कलंक दूर करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.