वडाळ्यातील एका बांधकाम प्रकल्पासाठी NOC देण्याच्या बदल्यात लाच मागितल्याप्रकरणी CBI ने मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. NOC साठी 1 कोटी रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप असून, तडजोडीनंतर 70 लाख रुपये देण्याचे ठरल्याचे तपासात समोर आले आहे. यापैकी 50 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना अभियंत्याच्या नातेवाईकाला CBI ने रंगेहात पकडले. या प्रकरणी मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात छापेमारी करण्यात आली असून आरोपींना आज CBI विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे.