Dharavi Experience Centre| धारावीचा इतिहास आणि उद्योगविश्वाचा वारसा, कागदावर नव्हे, पाहा नवी धारावी

धारावीकरांचं घराचं स्वप्न आता साकार होणार आहे. धारावी म्हणजे आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी..मात्र आता या धारावीचा पुनर्विकास फक्त कागदावर न राहता तो प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरताना दिसतोय. धारावीकरांचं भविष्यातलं घर कसं असेल.रस्ते, गार्डन आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा कशा असतील याची प्रत्यक्ष अनुभूती आता धारावी एक्सपिरिअन्स सेंटरमध्ये घेता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या धारावी एक्सपिरिअन्स सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. धारावीकरांना आपल्या भविष्यातल्या घरातली मोकळी जागा, खोल्यांची रचना आणि अंतर्गत लेआऊट या सॅम्पल फ्लॅटद्वारे प्रत्यक्ष पाहता येणार आहे.पुनर्विकासामुळे धारावीकरांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे. हे सेंटर नेमकं कसं आहे याचा आढावा घेतला आहे, प्रतिनिधी ऋतुजा कदम यांनी, पाहुयात.

संबंधित व्हिडीओ