बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती झालेल्या रुग्णांच्या नखं गळतीच्या बातमीची केंद्र सरकार कडून दखल घेण्यात आलीय.केंद्र सरकारच्या आकस्मित चिकित्सा राहत पथक बुलढाणा जिल्ह्यातील नखं गळती रुग्णांची तपासणी करण्यासाठी तात्काळ नियुक्त करण्यात आलीय. NCDC चे अतिरिक्त संचालक डॉ.तंझिन दिकिड यांच्या नेतृत्वात सरकारच्या आरोग्य विभागाच्या उच्च स्तरीय अधिकाऱ्यांच्या पथकाला केस आणि नखं गळती भागाचा तात्काळ दौरा करण्याचा आदेश देण्यात आलाय. सध्या शेगाव तालुक्यातील ७ गावात जवळपास ८० रुग्णांचे नखं गळल्याच समोर आल आहे.