राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावरुन सध्या राजकारण पेटलंय. त्यावरुन आता संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रियेवरुन त्यांचा समाचार घेतला. ठाकरे बंधू एकत्र आल्यास काहींना शेतात जावं लागेल ही भीती असल्याचा टोला संजय राऊतांनी शिंदेंना लगावला. तर दुसरीकडे कुणीही काही बोलू द्या, भूतकाळात जायचं नाही, असं म्हणत आपल्या उद्धव ठाकरे गटाची भूमिकाही मांडली.