मंत्री धनंजय मुंडेंवरील आरोपांबाबत भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आपली भूमिका जाहीर केली.धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत ते खंडणी गोळा करणारे नाहीत असं नामदेव शास्त्री म्हणाले.53 दिवसांपासून मुंडेंची मीडिया ट्रायल सुरु असल्याचंही म्हणत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली.धनंजय मुंडेंना जाणीवपूर्व त्रास दिला जातोय असंही शास्त्रींनी म्हटलंय.बीडमधील जिल्हा नियोजन बैठक संपल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री धनंजय मुंडेंनी भगवान गडावर मुक्काम केला. बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी भगवान गडावर दर्शन घेतलं आणि नामदेव शास्त्री यांच्याशी धनंजय मुंडेंनी आरोपांविषयी शास्त्रींशी चर्चा केली.