महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजमध्ये भाविकांची संख्या वाढलीय.यात विमानमार्गाने येणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय आहे. हीच संधी साधून विमान कंपन्यांनीही तिकिट दरात मोठी वाढ केलीय.मुंबई, पुण्याहून प्रयागराजसाठी तिकिटांचे दर साधारण 20 ते 25 हजार रुपयांच्या घरात आहेत.दरम्यान प्रयागराजचं विमान तिकीट आणि दुबईच्या विमान तिकीटाचे दर एकसारखेच असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय.अखेर केंद्र सरकारने याची दखल घेत तिकीटांचे दर 50 टक्के कमी करण्याचे निर्देश दिलेत.