मुंबई मनपा निवडणुकीसंदर्भात भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडतेय.या बैठकीला बिहार निवडणुकीत जादूची कांडी फिरवणारे विनोद तावडे देखील उपस्थित असून आता मुंबई महानगर पालिकेत विनोद तावडे लक्ष घालणार का? याची चर्चा सुरु झालीय.अर्ज दाखल करण्यासाठी काही दिवस असतानाच बैठकीत विनोद तावडे यांच्या ऍन्ट्रीनं सगळ्याचं लक्ष वेधून घेतलंय.